30.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

बांबू लागवडीसाठी ४५० हेक्टरचे लक्ष, रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत...

राजापुरात आठवडा बाजारातील नियम धाब्यावर…

शहरात दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून...

मुरुड किनारी मृत कासव ठेवले झाडाला टांगून…

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवाला मारून झाडाला...
HomeRatnagiriमोकाट ४०० गुरांना रेडियम बेल्ट', रत्नागिरीतील तरुणांनी घेतला पुढाकार

मोकाट ४०० गुरांना रेडियम बेल्ट’, रत्नागिरीतील तरुणांनी घेतला पुढाकार

जे. के. फाईल्स, परटवणे, झाडगाव, मिऱ्या रोड यासह आठवडा बाजारात काही गुरे आढळतात.

आजूबाजूच्या ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरात आलेली मोकाट गुरे ठिकठिकाणी ठिय्या मांडून बसलेली असतात. त्यांच्यामुळे अनेकवेळा अपघात होतात; परंतु, त्यावर उपाययोजना करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. शहरामध्ये सुमारे हजार ते बाराशे मोकाट गुरे असल्याचा अंदाज आहे. त्यांना हाकलणे अशक्य असल्यामुळे किमान काळोखातून फिरताना वाहनांना अपघात होऊ नयेत यासाठी गेल्या महिन्याभरात सुमारे ४०० गुरांना रेडियम बेल्ट बांधण्यात आले आहेत. शहरात नोकरी करणाऱ्या सहा तरुणांनी ही मोहीम अविरत सुरू ठेवली असून, आणखी २०० बेल्ट त्यांनी खरेदी केलेले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातही आजकाल मोकाट गुरांचा प्रश्न सतावत आहे. गुरांचे संगोपन करण्याऐवजी मालक त्यांना मोकाट सोडून देतात. त्यामुळे या मोकाट गुरांचे वास्तव्य शहर परिसरात वाढलेले आहे. गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून राहतात.

त्यामुळे अनेकदा वाहन अपघातांच्या घटना घडतात. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न रत्नागिरीतील अनेक भागांमध्ये भेडसावतो. रस्त्यांवर प्राणी सोडले जाऊ नयेत, यासाठी अनेकदा प्रशासन स्तरावरूनही आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अनेक गुरेमालकांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे रात्री अंधारात न दिसल्यामुळे त्यांना वाहनांची धडक बसते. त्यामध्ये गुरांचे बळी जातात आणि माणसांच्या जीवालाही धोका होतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी शहरातील सहा तरुणांनी गोसेवा महासेवा मानून गुरांना रेडियम बेल्ट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यात अनुप सिंह, सूर्यवीर सिंह, वने सिंह, हिम्मत सिंह, प्रकाश कुमार, प्रवीण कुमार या तरुणांचा समावेश आहे. ते काम आटोपल्यानंतर रात्री शहरात फिरून मोकाट गुरांचा शोध घेतात आणि त्यांना रेडियम बेल्ट बांधतात.

त्या गुरांना पकडणे मोठे जिकिरीचे असते. त्यासाठी रात्री जिथे गुरांचा वावर असतो तिथे जाऊन त्या गुरांना खाद्य दिले जाते. ती गुरे खाण्यासाठी थांबली की, बेल्ट बांधला जातो. तो बेल्ट काळोखात चमकतो आणि पुढे जनावरे आहेत याची वाहनधारकांना कल्पना येते. त्यामुळे अपघात टाळता येतात. या उपक्रमात महिन्याभरात सुमारे ४०० मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्यात आले आहेत. काही लोकांनी दिलेल्या आर्थिक साह्यातून आणखी २०० बेल्ट खरेदी करण्यात आलेले आहेत. मोकाट गुरांची संख्या अधिक असल्यामुळे त्या सर्वांना बेल्ट बांधणे अशक्य झाले आहे.

जनावरे आढळण्याची ठिकाणे – रत्नागिरी शहरात शिवाजीनगर येथील आयटीआयसमोरील मंगळवारचा बाजार भरत असलेल्या मोकळ्या जागेत रात्री सुमारे शंभर जनावरे बसलेली असतात. त्याचबरोबर जे. के. फाईल्स, परटवणे, झाडगाव, मिऱ्या रोड यासह आठवडा बाजारात काही गुरे आढळतात.

RELATED ARTICLES

Most Popular