28.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriरत्नागिरी न.प.ला जाग आली ! पाईप लाईन टाकण्यास सुरुवात

रत्नागिरी न.प.ला जाग आली ! पाईप लाईन टाकण्यास सुरुवात

पानवल धरण ते नाचणेपर्यंत सुमारे १३०० मीटर लांबीची ाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

पालिकेला उपरती झाली आणि वर्षभर रखडलेल्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतच्या नैसर्गिक उताराने ग्रायव्हिटी पाणी आणण्यासाठीची पाईपला टाकण्याच्या कामाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. आजपासून हे काम सुरू झाले. अन्वी कंपनीने कामाचा सव्र्व्हे केला असून जुनी राहिलेली पाईपलाईन काढुन घेतली. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे फ्लोटिंग पंपांच्या विद्युत बिलापोटी पालिकेला सुमारे दीड कोटीचा भुर्दंड सोसावा लागला आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरील जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून शीळ नदीवर फ्लोटिंग पंप बसविण्यात आले आहेत. सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे ४५० मीटरच्या पाईपलाईनचा समावेश आहे. परंतु वर्ष झाले तरी ही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.

गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट झाले होते. परंतु मुसळधार पावसाळ्यात टाकण्यात आलेले पाईप वाहुन गेले होते. त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले. सुमारे ५४ लाखाचे हे काम होते. त्यानंतर दुसरा पावसाळा आला तरी पालिकेने हे काम हाती घेतलेले नाही. सुमारे ५४ लाखांच्या कामासाठी वर्षभर फ्लोटिंग पंपांच्या बिलासाठी सुमारे दीड कोटी पालिकेने मोजले आहेत. जनतेच्या पैशाची पालिका उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे पालिकेने अन्वी कंपनीशी चर्चा करून कामाचा सर्व्हे पुर्ण केला. पुर्वी टाकलेले पाईप काढून घेतले. जादा मशनरी मागविण्यात आली असून कामाला सुरवात केली आहे.

पानवल धरणाचीही १३०० मीटरची पाईपलाईन टाकणार – शीळ धरणाच्या कामाबरोबर पानवल धरणाच्या पाईपलाईनचे काम देखील रखडले होते. पानवल धरण ते नाचणेपर्यंत सुमारे १३०० मीटर लांबीची ाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सुधारित नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कंपनीकडेच हे काम देण्यात आले आहे. दोन्ही कामं सुमारे ३ कोटीची आहेत. त्या कामांना कंपनीने सुरवात केली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याला दुजोरा दिला.

RELATED ARTICLES

Most Popular