23.4 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास...

मिऱ्या- नागपूर महामार्गाची ‘डेडलाईन’ हुकणार? मे अखेर काम पूर्ण होणे कठीण!

विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या...
HomeChiplunचिपळुणात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला वेग

चिपळुणात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला वेग

पावसाळ्यात ढासळलेल्या गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण कामातर्गत चिपळूण हद्दीतील रखडलेल्या कामाना अखेर चांगलाच वेग मिळू लागला आहे. विशेषतः परशुराम घाटात दरडींच्या धोक्याला अटकाव करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या आणि पावसाळ्यात ढासळलेल्या गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच उड्डाणपुलाच्या स्लॅबसह जोडरस्त्यांच्या कामांतही गती आली असून पुढील सहा महिन्यांत ही प्रमुख कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महाम ार्गावरील सुमारे ५.४० किलोमीटरचा परशुराम घाट हा कोकण प्रदेशातील महत्त्वाचा घाट मार्ग मानला जातो. चौपदरीकरणाच्या कामासाठी हा घाट चिपळूण व खेड अशा दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला. मात्र, घाट तोडफोडीपासूनच या कामांना वारंवार विघ्नांचा सामना करावा लागला, काम चिपळूण ादरम्यान अपघाती मृत्यू, सतत दरडी कोसळणे, संरक्षणभिंतींना तडे जाणे अशा घटनांमुळे चौपदरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला होता.

दरडीचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारनेटेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीएचडीसीएल) यांची विशेष नेमणूक करून घाटाचे सखोल सर्वेक्षण करवून घेतले. त्यांच्या सूचनेनुसार कोट्यवधींच्या निविदेद्वारे डोंगराला जाळ्या बसविणे व गॅबियन वॉल उभारणीचे काम सुरू केले गेले. मात्र मागील मे महिन्यात पावसाळ्यांपूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच अनपेक्षितरीत्या मुसळधार पाऊस कोसळल्याने कामावर पाणी फिरले. अनेक ठिकाणी गॅबियन वॉल कोसळल्याने महामार्ग विभागाने सर्व कामे तात्पुरती स्थगित करत घाटात केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाच्या पाण्यामुळे उर्वरित बांधकामाचे नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादनही तात्पुरते टाकण्यात आले होते.

पावसाळा संपताच आता घाटातील अपूर्ण कामांना वेग देण्यात आला आहे. सुधारित रचनेनुसार गॅबियन वॉल उभारणी पुन्हा सुरू झाली असून ती जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या स्लॅबचे ८०० मीटरहून अधिक काम पूर्ण झाले असून जोडरस्त्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांमुळे परशुराम घाटातील वाहतूक पूर्ववत आणि सुरक्षित ‘करण्याचा प्रयत्न महामार्ग व संबंधित कंत्राटदार कंपनीकडून केला जात आहे. पुढील राहा महिन्यामध्ये ही महत्त्वांची कामे पूर्णत्वास नेण्याचे ‘उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे..

RELATED ARTICLES

Most Popular