सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे २ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्याआधी अलायन्स एअरच्या विमानाने बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा २४ मिनिटांचा सुरक्षित प्रवास केरून टेस्ट लँन्डिंग यशस्वीपणे पार केले आहे.
शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रिय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर एमआयडीसी, आयआरबी व विमान कंपनीने नियोजन सुरू केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर दोन दिवस आधी गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने अवघ्या २४ मिनिटांचा प्रवासाची करून टेस्ट घेतली. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाप देखील विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले.
सिंधुदुर्ग चिपी विमानतळ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, आता शनिवार, ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा असल्याने, या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाची चाचणी घेण्यात आली. सिंधुदुर्ग विमानतळावर गोव्याहून आलेल्या विमानाचे बुधवारी दुपारी १२ वाजता सुरक्षित लँडिंग झाले. विमानासोबत आलेल्या इंजिनिअर स्टाफने या विमानतळाची धावपट्टी चांगली व सुरक्षित असल्याचे मत नोंदविले असल्याची माहिती शिवसेनेचे खास. विनायक राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर पुढील एक तासामध्ये अलायन्स एअरचे विमानाने पुन्हा गोव्याकडे जाण्यासाठी चिपी विमानतळाच्या धावपट्टीवरून गोव्याच्या दिशेने उड्डाण केले. लवकरच सिंधुदुर्ग ते शिर्डी विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे, असे खास. राउत यांनी सांगितले.
चिपी विमानतळावरून सुरु असलेले वाद सुरूच राहिले तरी, अखेर २ दिवसांनी त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याने, सिंधुदुर्गवासियांप्रमाणेच अख्ख्या कोकणासाठी हि गोष्ट अतिशय अभिमानाची आहे. विमान प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी महिन्याभराचे तिकिट बुकिंग देखील फुल्ल झाले आहे.