30.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraकैदी नं.९५६ आर्यन खान, आर्थर जेलमधील नवी ओळख

कैदी नं.९५६ आर्यन खान, आर्थर जेलमधील नवी ओळख

बॉलीवूड किंग शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये N-९५६ हा नंबर देण्यात आला आहे.

बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या अनेक एका पाठोपाठ अनेक संकटांचा सामना करत असताना दिसत आहे. मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाने त्याच्या कुटुंबाला चांगलंच चिंतेत पाडलं आहे. कालही आर्यन खानला जमीन मिळाला नाही. त्याच्या कारवाईला वेळ लागत असून, पुढील सुनावणी येत्या २० ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रथम  त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर इतर कैद्यांप्रमाणे त्यालाही कैदी नंबर देण्यात आला आहे.

त्याच्या विरुद्ध NCB ने काही पुरावे सादर करत त्याला जामीन न देण्याची अपील केली आहे. त्यामुळे या केसची सुनावणी २० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर आर्यन खानची रवानगी आता आर्थर जेलमध्ये झाली असून, त्याला कैदी नंबरसुद्धा देण्यात आला आहे. प्रत्येक जेलमध्ये कोणत्याही कैद्याला नावाने न पुकारता, नंबरनेच कैद्यांना बोलावलं जातं. हा नंबरच त्यांची ओळख असतो. बॉलीवूड किंग शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये N-९५६ हा नंबर देण्यात आला आहे.

हा त्याचा कैदी नंबर असून आता जेलमध्ये आर्यन खानची नवी ओळख  कैदी नंबर ९५६ अशी बनली आहे. तसेच कैद्यांना जेलच्या कँटीनमधून आपल्यासाठी काही सामान खरेदी करण्याची मुभा असते. यासाठी कुटुंबियांकडून एक ठराविक रकमेचा कुपन घेण्याची परवानगी घ्यावी लागते. या कुपनची रक्कम ४,५०० रुपये इतकी आहे. आर्यन खानलासुद्धा कुटुंबियांकडून ४,५०० रुपयांचं कुपन जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानने त्या कुपनचा वापर करत जेलच्या कँटीनमधून स्वत:साठी बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्यांची खरेदी केली आहे.

३ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये एका हायप्रोफाईल क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये NCB ने छापा मारत आर्यनसह या सर्वांना ताब्यात घेतले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दावा केला होता कि, क्रूझमधील काही व्यक्तींकडून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. आर्यन खान सोबत अजून दोघांना देखील अद्याप जामिन मंजूर करण्यात आलेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular