HomeRatnagiriजिल्हयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात

राष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा विविध स्तरांवरील सोयी-सुविधांच्या तयारीत अंतिम शिक्कामोर्तब करत आहेत.

राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या १२ फेब्रुवारी २०२२  रोजी होणाऱ्या आंबडवे गावाचे नियोजीत दौऱ्याचे तयारी वेगाने सुरू असून, सर्व अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी ५  फेब्रुवारी २०२२ रोजी मंडणगड तालुक्याचा दौरा केला, त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा पोलीस दलासह सर्वच शासकीय यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी दौऱ्याचे पुर्वतयारीचे कामात व्यस्त झालेले दिसून आले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी शिरगाव येथील मैदानाला भेट दिली. मैदानातील विविध व्यवस्थांचा जिल्हाधिकाऱ्यानी आढावा घेतला आहे.

राष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा विविध स्तरांवरील सोयी-सुविधांच्या तयारीत अंतिम शिक्कामोर्तब करत आहेत. तसेच राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, तिथे काहीही आक्षेपार्ह दिसू नये यासाठी मार्गावरील गावांच्या परिसराची साफसफाई करताना नादुरूस्त फलक काढून प्रवासी शेड यांची तातडीने दुरूस्ती केली आहे. शाळा, कार्यालये येथील सुद्धा फलक पुन्हा रंगवण्यात आले आहेत.  दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर होणारा कायापालट पाहून मंडणगड, तुळशी, पाले, पाचरळ, आंबडवेमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिरगांव हेलिपॅड ते आंबडवे येथील नियोजित कार्यक्रमाचे स्थळ या अंतरातील रस्त्याची डागडुजी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. रस्त्याच्या बाजूपट्टीवर माती टाकणे, याचबरोबर रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवले जात आहेत. याशिवाय रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळे येवू नयेत, याकरिता या अंतरातील सध्या कार्यरत असलेले सर्वच्या सर्व गतिरोधक उखडून टाकण्यात आले असून रस्ता लेवल केला आहे. मंडणगड नगरपंचायतीने बाजारपेठ व नगरपंचायतीचे कार्यक्षेत्रातील अंतरातील रस्त्याचा परिसर स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

यावेळी जिल्हातील महसुल यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,  सार्वजनीक बांधकाम, जिल्हा परिषदचे विविध स्तरातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा मंडणगड दौरा यशस्वी करू असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular