26.3 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeRatnagiriशुभकार्याहून परतताना कार पलटी, कर्त्या पुरुषाचा मृत्यू

शुभकार्याहून परतताना कार पलटी, कर्त्या पुरुषाचा मृत्यू

पांगरी कड्याचा पऱ्या येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात जाऊन पलटी झाली.

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप गावातील कुंभार कुटुंबीय शुभ कार्याहून परतत असताना एका वळणावर अचानक कार वरचे नियंत्रण सुटल्याने, कार एका बाजूला पलटी झाल्याने कुटुंबाला घरातील कर्त्या पुरुषाला गमवावे लागले आहे. घडले असे कि, गोपीनाथ गोपाळ कुंभार वय ६४, रा. फणसोप, ता. रत्नागिरी हे पुतण्याच्या साखरपुड्याला पाटगाव येथे सहकुटुंब गेले होते.

साखरपुडा आटोपून हे पाचजण फणसोप येथे परतत असताना पांगरी कड्याचा पऱ्या येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात जाऊन पलटी झाली. या अपघातात गोपीनाथ कुंभार यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

संगमेश्वर तालुक्यातील पांगरीतील कड्याचा पऱ्या येथे स्विफ्ट डिझायर कार उलटून १ जण ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.  याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथ गोपाळ कुंभार असे अपघातात मृत पावलेल्या वृध्दाचे नाव आहे.

दरम्यान कारमधील कुणाल किरण कुंभार, किरण भास्कर कुंभार, रूपेश रमेश पावसकर,  कविता गोपीनाथ कुंभार हे चौघांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचार करून घरी देखील सोडण्यात आले. परंतु, घरातील प्रमुख सदस्याचा या अपघातामध्ये प्राण गेल्याने, कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  या अपघाताची खबर कुणाल कुंभार याने देवरूख पोलिस ठाण्यात दिल्यानंतर, पोलिस उपनिरीक्षक पाटील, पोलिस नाईक जावेद तडवी, पोलिस नाईक किशोर जोयशी, पोलिस नाईक संदेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि

RELATED ARTICLES

Most Popular