28.2 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeIndiaडिझेलसाठी अतिरिक्त पैसे आकारणे अयोग्य, नियमित दरात डिझेल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

डिझेलसाठी अतिरिक्त पैसे आकारणे अयोग्य, नियमित दरात डिझेल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

देशातील मच्छीमारांना योग्य दरात डिझेल विक्री होणे आवश्यक असल्याचे रूपाला यांनी स्पष्ट केले.

मच्छिमार आणि त्यांच्या समस्या संपायच्या नावच घेत नाही आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मासेमारी व्यवसाय बघायला गेल तर पूर्णत: ठप्पच झाला आहे. आणि त्यामध्ये इंधनामध्ये झालेली भरमसाठ वाढ त्यामुळे परिस्थिती अजूनच हतबल झाली आहे. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरु असताना मासेमारीच्या नव्या कायद्यामुळे अनेक अडचणी समोर उभ्या ठाकल्या आहेत.

आणि त्यामध्ये भर म्हणून कन्झ्युमर ग्राहक व किरकोळ डिझेल विक्रेते मच्छीमारांकडून प्रति लिटरमागे २५ ते ३० रुपये जादा आकारत असल्याची तक्रार रूपाला यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारीची तातडीने दखल घेत, देशातील मच्छीमारांना योग्य दरात डिझेल विक्री होणे आवश्यक असल्याचे रूपाला यांनी स्पष्ट केले. आणि देशातील सर्व मच्छीमारांना नियमित असलेल्या दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी दिले.

महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, गुजरात फिशरमन बोट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी पुरुषोत्तम रूपाला यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मच्छीमारांच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या,  डिझेलसाठी मच्छीमारांकडून आकारण्यात येणारे जास्तीचे पैसे हे पूर्णत: चुकीचे असून एकप्रकारे त्यांच्यावर होत असणारा अन्याय असून यासंबंधी लवकरच केंद्रीय पेट्रोलियममंत्री व अर्थमंत्री यांच्या सोबत चर्चा करून मच्छीमारांना नियमित दरात डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठाम आश्वासन रूपाला यांनी दिले आहे.

सदर शिष्टमंडळात नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, तुलशी गोयल, जागतिक मच्छीमार संघटनेचे सदस्य व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, मुकेश पंज्यारी पोरबंदर, कन्यालाल सोलंकी, नरशी, गुजरात मत्सोद्योग महामंडळाचे अध्यक्ष वेलजी मसानी, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर, , बारया जाफराबाद व मोहन, भरत ओखा, समाजसेवक संजय सुतार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular