28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

कोकणच्या समुद्रात पाकिस्तानची बोट, सर्व यंत्रणा सतर्क

कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट...

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...
HomeKokanकमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली चिंता; मुसळधार पावसाचं सावट

कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली चिंता; मुसळधार पावसाचं सावट

संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

ऑक्टोबर हीटमुळं उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असतानाच एकाएकी राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाटचं सावट पाहायला मिळत आहे. हवाम ान विभागानं नव्यानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २४ तासांमध्ये पावसानं क्षणिक उघडीप दिली असली तरीही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा राज्यावर काळ्या ढगांचं सावट पाहायला मिळेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं एक तीव्र क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळं पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्यमहाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त रहाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात मंगळवारपासून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होताना दिसत आहे. येत्या काळात हे वारे आणखी तीव्र होणार असून, अरबी सम द्रात त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र अधिक प्रभावी राहणार आहे. मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र इथं राहणार आहे. ज्यामुळं पावसानं अद्यापही पाठ सोडलीच नाहीय असं म्हणणं गैर ठरणार नाही. सकाळ – दुपारी उन्हाचा तडाखा आणि सूर्य मावळतीला जाताना सुटणारा सोसाट्याचा वारा, त्यासह येणारा वादळी पाऊस या विचित्र हवामानामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular