27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeRatnagiriएसटी बसमध्ये चढण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी

एसटी बसमध्ये चढण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी

शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली असे आरोप तक्रारीमध्ये केले आहेत.

एस.टी. बसमध्ये चढण्याच्या किरकोळ कारणावरून एस.टी. बसचालक आणि प्रवासी यांच्यात बाचाबाची, वाद होवून एकमेकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून लांजा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ बसस्टॉप या ठिकाणी धमकी दिली. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोषांनी देखील त्यांना धक्काबुक्की केली असा आरोप करणारी तक्रार अमित पाटील यांनी सांजा पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी तिघांवर था. ८.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ३४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर परस्परविरोधी तक्रार नूर महम्मद इब्राहिम टोले यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे वेरळ येथे रत्नागिरी-राजापूर एस.टी. बसमध्ये चढत असताना चालक अमित आनंदा पाटील यांना तू दरवाजात उभा का आहेस? पुढे जा असे सांगितले. याचा राग बेतून अमित पाटील यांनी खाली उतरून आपली कॉलर पकडली. तसेच धक्काबुकी करून ठोशाने तोंडावर मारहाण केली. आणि शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली असे आरोप तक्रारीमध्ये केले आहेत. या तक्रारीनुसार बालक अमित पाटील यांच्यावर भा.द.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ३४. ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टे राजेंद्र कांबळे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular