सर्वागीण विकास हा आपला ध्यास आहे. प्रलंबित राहिलेल्या विकास कामांना चालना देऊन त्या त्या गावांना विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी मी आपल्या मंत्री पदाचा योग्य वापर करून विकास कामांच्या पुर्ते साठी निधीची उपलब्धता करून तेथील प्रलंबित विकास कामांची पुर्तता केली आहे त्यापैकी मंडणगड तालुक्यातील तोंडली हे एक गाव आहे याचा मला एक लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे. अशी भावना राज्याचे गृह, महसूल राज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांनी तोंडली येथे बोलताना व्यक्त केली. या वेळी तोंडली ग्रामस्थांनी नाम. योगेश कदम यांचे पारंपरिक ढोल सनई टिमकी वादय खालुबाजाच्या तालावर लेझीम नाचत वाजत गाजत जोरदारपणे स्वागत केले. मंडणगड तालुक्यातील तोंडली, आतले, वडवली, देव्हारे, शेवरे, उन्हवरे, दहींबे, वेरळ, पालवणी या गावातील रहिवाशांसाठी तसेच आतले तोंडली या दोन गावा दरम्यान भारजा नदीवरील मंजुर पुलाच्या कामाचे भुमीपुजन नाम. योगेश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत योजनेतून या महत्त्वाच्या अशा पुलाच्या कामासाठी तब्बल ३६६. ५९ लक्ष इतका विकास निधी मंजूर करून मंत्री महोदयांनी विकासाच्या दुरदृष्टीची दिशा दाखवून दिली आहे. यावेळी तोंडली ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रभागा जाधव, उपसरपंच चंद्रकांत नागले, एस. के. वरूणकर, उपअभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, शाखा अभियंता श्री.उमापे मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर महिला समन्वयक अस्मिता केंद्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश दळवी, शिवसेना विभाग प्रमुख संजय शेडगे, नगरसेविका सेजल गोबळे आदींसह तोंडली ग्रामस्थ मंडळ मुंबई चे अध्यक्ष वसंत सकपाळ, मानद सचिव रमेश चव्हाण, प्रतिक भुवड, रामचंद्र सकपाळ, जयेश पवार, राजेंद्र नागले, मनोहर कदम, सुभाष गोरीवले, दिलिप कळबटे चंद्रकांत जाधव, कृष्णा आंबडस्कर, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष यशवंत पवार, दिलिप नागले, चंद्रकांत नागले, चंद्रकांत आंबडस्कर, महिला मंडळ अध्यक्षा प्रज्ञा फडणीस, नमिता पवार शारदा चिलबे आदींसह तोंडली येथील ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.