23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriराजकीय वस्त्रे बाजूला ठेवून संघर्षाची गरज - बाळ माने

राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून संघर्षाची गरज – बाळ माने

आता न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवला पाहिजे.

कोणीही येतो आणि आश्वासने देऊन जातो. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, आणखी कुणाला भेटू, असे झुलवत ठेवले जाते. एखाद्याला हाताशी धरून आंदोलनाची हवा काढायची, अशी काहींची भूमिका आहे; परंतु आता माघार घेतल्यास पुढच्या पिढ्यांचे नुकसान होणार आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर राजकीय वस्त्र बाजूला ठेवून संघर्ष केला पाहिजे. तळागाळातील छोट्या-मोठ्या आंबा शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार व भाजपचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी व्यक्त केली. विविध मागण्यांसाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे साखळी उपोषण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनाला आंबा बागायतदारांचा पाठिंबा मिळत आहे. पहिल्याच दिवशी शेकडो शेतकऱ्यांनी लावलेली उपस्थिती लक्ष वेधून घेतली होती. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, मिलिंद कीर यांच्यासह भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व आंबा बागायतदारांची उपस्थिती लक्षणीय आहे. या वेळी माजी आमदार बाळ माने म्हणाले, प्रत्येक गावागावात आंब्याची झाडे आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे, त्यांना एकत्र आणले पाहिजे.

१९९० पासून मोठ्या प्रमाणात आंबा लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा लागवड झाली. आज ही झाडे फळे देत आहेत; परंतु आंब्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी किलोवर आंबा कॅनिंगला विकावा लागतो. त्यामुळे खर्चाच्या निम्माही फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. आता न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवला पाहिजे. एखाद्याला हाताशी धरून आंदोलनाची हवा काढायची, अशी काहींची भूमिका आहे. त्यांच्या आहारी जातो; परंतु आता माघार घेतल्यास पुढच्या पिढ्यांचे नुकसान होणार आहे. आता आपले मुख्य लक्ष हे शेतकरी असून, संघटित आंदोलन करू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ आणि विषयाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

RELATED ARTICLES

Most Popular