31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

विनाकारण त्रास द्याल तर गप्प बसणार नाही आ. अनिल परबांचा इशारा

विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल...

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...
HomeChiplunविकासासाठी ना. नारायण राणेंना निवडून द्या, पालकमंत्री सामंतांचे आश्वासन

विकासासाठी ना. नारायण राणेंना निवडून द्या, पालकमंत्री सामंतांचे आश्वासन

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चिपळुणातील पूररेषेसह प्रलंबित सारे प्रश्न मार्गी लावू.

चिपळूणात आलेल्या पुरानंतर उद्भवलेल्या समस्या ३० सोडवण्यासाठी महायुती शासनाने भरघोस विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. चिपळुणवासियांच्या पाठीशी महायुतीचे शासन ठामपणे उभे आहे. विकासासाठी ना. नारायण राणेंना निवडून द्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चिपळुणातील पूररेषेसह प्रलंबित सारे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येथे घेतलेल्या मेळाव्यात बोलताना ना. उदय सामंत यांनी हा गंभीर आरोप केला.

यावेळी केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे, आमदार शेखर निकम माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजपा महिला मोर्चा चिटणीस निलम गोंधळी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, भाजप चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक आशिष खातू, मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी, आरपीआयचे नेते दादा मर्चेंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, पंचायत समिती माजी सदस्य बाबू साळवी, खेर्डीचे माजी सरपंच दाभोळकर, माजी सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, प्रलयकारी पुरानंतर चिपळूणं उभा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न गाळ उपसा, शहर सुशोभीकरणासाठी महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी चिपळूणसाठी दिलेला आहे. चिपळूणच्या दृष्टीने पूररेषेचा जाचक प्रश्न आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री राणेंच्या माध्यमातून आपण कायमचा सोडवू. त्याचबरोबर राणेंना चिपळूणने रत्नागिरीपेक्षा अधिक मताधिक्य दिले. तर जिल्हा नियोजन समितीचा निधी रत्नागिरीपेक्षा चिपळूणला अधिक देऊ, अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी आमदार शेखर निकम यांना यावेळी दिली.

मताधिक्क्य देणार – आ. निकम आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरासह मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून राबविलेला विकास कार्यक्रम सर्वांसमोर ठेवताना शहराच्या दृष्टीने वाशिष्टी नदी सुधार कार्यक्रमाला ही चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर रत्नागिरीपेक्षा जास्त मताधिक्क्य आम्ही या मतदारसंघातून राणेंना यांना देऊ अशी ग्वाही दिली. विरोधक संविधान बदलाची चुकीची माहिती लोकांना देत आहेत. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना कोणीही बदलू शकणार नाही, असा विश्वास उपस्थित जनतेला आ. त्तिकम यांनी यावेळी दिला.

मोदींच्या नेतृत्त्वाची गरज चव्हाण – शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात कोकणातून राणे यांना मोठे मताधिक्य देऊन पाठवणे आवश्यक आहे. महायुतीच्या माध्यम ातून चार लोकसभा निवडणुकांचा आपल्याला अनुभव असल्याने या मतदारसंघातून आमदार शेखर निकम आणि आम्ही सारे एकजुटीने प्रयत्न करून मोठे मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. या सभेचे सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे व मंदार कदम यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular