बळीराजासाठी यावर्षी खुशखबर आहे. यावर्षी पाऊस चांगलाच बरसणार असून मुख्य म्हणजे तो वेळेत दाखल होणार आहे. मान्सूसाठी अनुकूल वातावरण सध्या तयार झाले आहे. आजच्या तारखेपासून बरोबर २१ दिवसात मान्सून बरोबर अंदमानात दाखल होणार आहे. मान्सून हा हवेच्या दाबावर अवलंबून असतो. सध्या हवेचा दाब ७०० वरून ८५० हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत. मान्सूनची हालचाल आणि नंतरची सर्व प्रगती ही हवेच्या दाबावर अवलंबून असते. हवेचे दाब हे समुद्रावर १००० हेक्टा पास्कलवर गेले की मान्सूनची निर्मिती सुरू होते.
हवेचे दाब १००६वर गेले की, मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हे दाब १००८ वर गेले की, तो भारतात केवळे किनारपट्टीवर येतो. यंदा हवेचे दाब मान्सूनसाठी लवकर अनुकूल होत आहे, असे निरीक्षण हवामाना शास्त्रज्ञांनी केले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे २१ दिवस उरले आहेत. दरवर्षी मान्सून १८ ते २० मे दरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचे दाब अनुकूल झाले तर यंदा वेळे आधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ञांनी यंदा दिला आहे.
हवेचे दाब हे हेक्टा पास्कल या एककात मोजले जातात. २५ एप्रिल रोजी हवेचे दाब ५०० हेक्टा पास्कलवर होते. २८ एप्रिल रोजी ते ७०० हेक्टा पास्कलवर गेले, तर २९ एप्रिल रोजी एकदम ८५० हेक्टा पास्कल इतके झाले. हा दाब जेव्हा १००० हेक्टा पास्कलवर जाईल, तेव्हा मान्सूनला वेग येईल. समुद्रावर जेव्हा हवेचे १००६ वर जातील, तेव्हा तो अंदमानात दाखल होईल. हेच दाब १००८ वर गेले की, तो केरळमध्ये येतो. कारण समुद्रावर हवेचा दाब वाढले की देशाच्या इतर भागांत ते कमी म्हणजे १००२च्या आसपास असतात.
ज्या दिशेने दाब कमी त्या दिशेने मान्सूनचे वारे भारतात येतात. हिंदी महासागराचे तापमान आणि हवेचे दाब यावर मान्सूनच्या हालचाली ठरतात. यंदा हवेचे दाब मान्सूनला आतापासूनच पूरक वाटत आहेत. अंदमानात मान्सून २० मेच्या सुमारास येतो. म्हणजेच अजून २१ दिवस बाकी आहेत. हवेचे दाब जर आणखी वेगाने वाढले तर तो त्या क्षणाला लवकर येऊ शकतो.