25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri'लव्ह जिहाद' विरोधी कायदा तातडीने करा, महिलांना सुरक्षितता द्या

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने करा, महिलांना सुरक्षितता द्या

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्यावतीने उरण येथील हिंदू तरुणीची निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी व्हावी आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने व्हावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. नवी मुंबईतील उरण येथील बावीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रुरतेने आणि मानवतेला काळिमा फासला जावा, अशा प्रकारे हत्या करण्यात आली. या विरोधात केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. ही काही पहिली घटना नव्हे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक मुलींना लक्ष्य करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ यांनी गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे महिला आणि मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने जयस्तंभ येथे काल आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी श्री महापुरुष देवस्थान, कोकण नगर, रत्नागिरीचे प्रसन्न बिर्जे, मरूधर विष्णू समाजाचे विराम चौधरी, जितेंद्रसिंह, भोलाराम चौधरी, इस्कॉनचे विजय भाटकर, गणपतीपुळेचे माजी सरपंच महेश केदार, खोत विजय भिडे, माजी नगरसेवक महेंद्र साळवी, कुवारबाव व्यापारी संघाचे सचिव प्रभाकर खानविलकर, रा. स्व. संघाचे प्रदीप दांडेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, गोप्रेमी अमितराज खटावकर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुवारबावचे मंगेश राऊत, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कदम यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular