24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeChiplunअखेर कठीण कातळ फुटला - परशुराम घाट

अखेर कठीण कातळ फुटला – परशुराम घाट

गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. आता तो कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथे रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरू केले आहे. परशुराम घाट ते आरवलीदरम्यानच्या ३६ किलोमीटरमध्ये केवळ सव्वा किलोमीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे. गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते.

मात्र, आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने याआधीच काम पूर्ण केले; परंतु खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. मात्र, आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे कामदेखील वेगाने सुरू झाले आहे. घाटात चौपदरीकरणातील दुसराही मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी आधी पावसाळ्यात महामार्गावर आलेली दरडीची माती हटवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular