27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeMaharashtraराज्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी

राज्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अधिकारा अंतर्गंत बंदी घालण्यात आल्याचं मत्स्य व्यवसाय विभागानं पत्रकाद्वारे कळवलं आहे.

राज्याच्या सागरी मासेमारी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै हा कालावधी मासेमारी करण्यावर बंदी घालण्याचे  आदेश मत्स्य व्यवसाय विभागानं दिले आहेत. समुद्रातल्या मासळीच्या साठ्याचं जतन करणं तसंच मच्छिमारांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्याच्या हेतूनं ही बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अधिकारा अंतर्गंत बंदी घालण्यात आल्याचं मत्स्य व्यवसाय विभागानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. या कालावधीत लागू केलेली बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना देखील आहे. जिल्ह्यात ४४२ बिगर यांत्रिकी नौका तर ३ हजार ७७ यांत्रिकी नौका आहेत. यांत्रिकी नौकांना बंदी आदेश लागू असून पारंपारिक पद्धतीने बिगर यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणार्‍या मासेमारीस बंदी नाही.

राज्याच्या जलधी क्षेत्रात खोल समुद्रात सागरी किनार्‍यापासून १२ मैलाच्या पुढे जाणार्‍या मासेमारी नौकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लागू राहणार आहेत. सागरी किनार्‍यापासून बारा मैलांपर्यंत बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियमानुसार संबंधित नौका, सर्व साधनसामुग्री व मासळी जप्त करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कालावधी मासेमारी बंदी कालावधी म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु ही बंदी पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू असणार नाही. त्या संदर्भातला आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे. त्यामुळेच आधीच नुकसानीमध्ये सुरु असलेला व्यवसाय आता अजूनच संकटात सापडणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular