28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरु…

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम...

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeRatnagiriसोळा लाख नागरिकांना मोफत उपचार, जुलैपासून अंमलबजावणी सुरू

सोळा लाख नागरिकांना मोफत उपचार, जुलैपासून अंमलबजावणी सुरू

जिल्ह्यातील १२ खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता सर्व रेशनकार्डधारकांनाच मिळणार आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीच मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे १ जुलैपासून या योजनेअंतर्गत अंतर्भूत असलेल्या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. आता या योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकूण ४ लाख २६ हजार ५९९ रेशनकार्डवरील १६ लाख ६१ हजार ५६२ नागरिकांना मिळणार आहे. पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मात्र आपले रेशनकार्ड ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होत होते; मात्र, त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली.

त्यानुसार ही योजना आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजना अशा एकत्रित योजनेतून ५ लाख मोफत लाभ रुपयांपर्यंत उपचाराचा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू लागले आहेतच; पण आता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यात हृदयाचे आजार, कर्करोगविषयक शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, मेंदूविषयक आदी आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.

उपचार किंवा शस्त्रक्रियांचा पाच लाखांपर्यंतचा खर्च शासन करणार आहे. यात ३३ विशेष रोगांकरिता कॅशलेस उपचार आणि शस्त्रक्रिया उपचार मोफत होणार आहेत. यात उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे. पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्डधारक यांनाही या योजनांचे लाभ मिळणार आहेत.

दृष्टिक्षेपात – महात्मा फुले जनआरोग्य योजना. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. ५ लाखांपर्यंत मोफत उपचार. शासकीयबरोबर १२ खासगी रुग्णालयांचा समावेश.

ऑनलाइन कार्ड होणे गरजेचे – मोफत उपचारासाठी रेशनकार्डावरील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला लिंक केल्यानंतर १२ आकडी नंबर मिळतो. अशा ऑनलाइन झालेल्या कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया त्यातील सर्वांत महत्त्वाची असल्याने त्यासाठी आता लोकांनी धावाधाव सुरू केली आहे. त्यासाठीही सेतूमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

या रुग्णालयात मोफत उपचार – जिल्हा शासकीय रुग्णालय, कामथे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय प्रादेशिक मनोरुग्णालय या सरकारी रुग्णालयांबरोबरच वालावलकर रुग्णालय डेरवण, रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, लाइफकेअर हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण, एसएमएस हॉस्पिटल चिपळूण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular