26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunराष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना सन्मान देऊ - आमदार शेखर निकम

राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना सन्मान देऊ – आमदार शेखर निकम

बामणोलीतील ग्रामस्थांनी आमदार निकम यांचा गौरव केला.

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावातील शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख आणि माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मानच होईल, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली. बामणोली येथील माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अर्चना कांबळे, शाखाप्रमुख शिवसेना (उबाठा) सीताराम माईन यांच्यासह दत्ताराम राणे, सुषमा दळवी, अनिल गुरव, सुयश गुरव, एकनाथ बेटकर, सहदेव बारे, गंगाराम भिसे, प्रकाश जाधव आदी प्रमुख ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आमदार निकम यांनी त्या सर्वांचे पक्षात स्वागत केले. बामणोलीतील ग्रामस्थांनी आमदार निकम यांचा गौरव केला. आमदारांनी अडीच वर्षात आरोग्यसेवा, पाणीप्रश्न, ग्रामपंचायत विकास, रोजगार, शेती विकास, पर्यटन विकास, ऐतिहासिक वारसा जपणूक, कला-क्रीडा, शैक्षणिक विकास, आपत्ती निवारण यांसह विविध विकासकामे। केली. विविध योजनेंर्तगत कोट्यवधीचा निधी मंजूर करून आणला. हा निधी नियोजनबद्ध खर्च करून गावागावाचा विकास करत एक आदर्श नेतृत्वाचा ठसा उमटवल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आगामी निवडणुकीत आमदार निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून बामणोली गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकवण्याचा निर्धारही या प्रसंगी ग्रामस्थांनी केला. या कार्यक्रमाला शिरीष दळी, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, किसन राणे, संग्राम राणे, गणपत बेटकर, सुरेश माईन, ओमकार गायकवाड इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular