रत्नागिरी पालिकेच्या माळनाका येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात साडे १७ हजार जणांनी भेट देऊन टुडी आणि थ्रीडी शोमधून अवकाशातील अंतराळविश्वाचा आनंद घेतला. यातून पालिकेला १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. माळनाका येथे पालिकेच्या मालकीचे हे तारांगण आहे. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिक तसेच पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालिकेला जानेवारी २०२३ ते २७ जून २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत तारांगणातून १८ लाख १४ हजार ५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे.
या कालावधीत ६ हजार ४९१ मोठ्या माणसांनी तर १० हजार ५४५ लहान मुलांनी तारांगणचे शो पाहिले. महिनावार काढलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात १ हजार ५७८ मोठी माणसे, ४ हजार २६२ लहान मुलांनी तारांगणमधील शो पाहिले. यातून ६० हजार ३२०० एवढे उत्पन्न मिळाले. फेब्रुवारी महिन्यात १ हजार ११४ मोठी माणसे, १ हजार ९०७ लहान मुलांनी तारांगणाला भेट दिली. यातून ३ लाख ३२ हजार ३५० एवढे उत्पन्न मिळाले. मार्च महिन्यात ६१० मोठी माणसे, ७८९ लहान मुलांनी तारांगणमधील शो पाहिले. यातून १ लाख ७० हजार ५० रुपये उत्पन्न मिळाले.
एप्रिल महिन्यात १ हजार ३८५ मोठी माणसे, १ हजार ४३३ लहान मुलांनी तारांगणाला भेट दिली. यातून २ लाख ८० हजार ९५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात १ हजार २७३ मोठी माणसे, १ हजार ६७२ लहान मुलांनी तारांगणातील शो पाहिले. यातून ३ लाख १ हजार ६५० रुपये उत्पन्न मिळाले. जून महिन्यात २७ जूनपर्यंत ५३१ मोठी माणसे, ४८२ लहान मुलांनी तारांगणमधील शो पाहिले तर १ लाख २५ हजार ८५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले.
काय पाहायला मिळेल तारांगणात – तारांगणामध्ये अंतराळातील माहिती देणारे नऊ ते दहा शो बनवण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रावरील सफर, रॉकेट लाँच कसे केले जाते, ते चंद्रावर कसे उतरते तसेच तात्यांची माहिती शोद्वारे पाहायला मिळते. अवकाश कसे आहे, कोणते ग्रह आहेत हे टुडी आणि थ्रीडी शोमधून दाखवण्यात येते. यामधून लहान मुलांच्या ज्ञानात भर पडते.