27.2 C
Ratnagiri
Friday, February 27, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeChiplunगोवळकोट ताराबौद्धवाडीत दरड कोसळली, दोन घरांना धोका

गोवळकोट ताराबौद्धवाडीत दरड कोसळली, दोन घरांना धोका

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, भूवैज्ञानिकांनी या डोंगराची पाहणी केली होती.

शहरातील गोवळकोट ताराबौद्धवाडी येथे दरड कोसळून दोन घरांना धोका निर्माण झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली. पालिका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच धोका निर्माण झालेल्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. गोवळकोट बौद्धवाडी येथे काही वर्षापूर्वी डोंगराला भेगा पडल्या होत्या. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, भूवैज्ञानिकांनी या डोंगराची पाहणी केली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार होता; मात्र कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा याच भागात दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असतानाच बौद्धवाडी येथील मदरसालगत असलेल्या वस्तीच्या ठिकाणी दरड कोसळली. या दरडीच्या पायथ्याशी असलेल्या रामलिंग चंद्रकांत मिसाळ आणि प्रदीप सखाराम पारदळे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. दरड कोसळल्याने येथे मोठ्या प्रमाणात माती व दगड घरालगत आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रशासकिय अधिकारी मंगेश पेढांबकर, नगर अभियंता प्रनोळ खताळ, बांधकाम अधिकारी विनायक सांवत, संदेश टोपरे यांनी पाहणी केली.

जेसीबी आणि कामगारांच्या साथीने दगडमाती हटवण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रांत लवेकर, दयानंद जुवळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या यंत्रणेस मदत केली. तसेच भविष्यात दरड कोसळून वित्तहानी, जीवितहानी होऊ नये यासाठी पालिकेने तातडीने तेथील घरांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular