27.2 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeChiplunगुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलाच्या दिशेने पलायन केले होते.

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे म्हणून पोलिसांना चकवा देत फरार झाल्याचे वृत्त सर्वत्र जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. परंतु गुहागर पोलिसांनी पलायन केलेल्या आरोपीच्या अवघ्या ४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांचा माग घेत त्याला शोधून काढलं आहे.

चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलाच्या दिशेने पलायन केले होते. त्यानंतर त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अखेर त्या आरोपीला चिखली मधील देवराठी येथे लपून बसलेल्या एका ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे.  गुहागर पोलीस आरोपीला चिपळूण कोर्टामध्ये हजर करून पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात असताना आरोपीने चिखली येथे पोलिसांना चकवा देत पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने एक प्रकारे  खळबळ उडाली.

गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले होते. काल सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस दुचाकीवरून चिपळूण वरून गुहागरला आणत असताना ही घटना घडली. निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी हा संशयित आरोपी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्यासाठी अटक होता.

त्याला चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्याकरता गुहागर मधील पोलीस दुचाकी वरून घेऊन गेले होते. चिपळूण वरून पुन्हा परत आणत असताना चिखली स्टॉपच्या दरम्याने आपल्याला लघुशंकेसाठी आरोपीने थांबवण्यास सांगितले.  त्याप्रमाणे पोलीस यांनी दुचाकी थांबवली. मात्र या आरोपीने तेथून पलायन केले आहे. चिखली येथे जवळच दाट जंगल असल्याने त्यांनी त्या जंगलात पलायन केले. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते. यावेळी चिखली येथील विशाल कदम ,प्रदीप खैर ,प्रकाश कदम ,उमेश गुरव ,बाबा कदम आदी ग्रामस्थ आणि चोराला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular