31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriमुद्रांक शुल्क नव्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिंदे गट आक्रमक

मुद्रांक शुल्क नव्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिंदे गट आक्रमक

जिल्ह्यातील प्रत्येक सेतू केंद्रामध्ये फ्लेक्स बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी

मुद्रांक शुल्कबाबत शासन निर्णय होऊन देखील त्याची रत्नागिरीत अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा, प्रत्येक सेतू केंद्र मध्ये फ्लेक्स बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी व जनजागृती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय कार्यालयासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, हमीपत्र किंवा शासनाच्या विविध कामासाठी बॉण्ड पेपरवर करण्यात येणारी सर्व प्रतिज्ञापत्र ही साध्या ‘कागदावर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णयदेखील करण्यात आला. मात्र या निर्देशची अंमलबजावणी स्थानिक सेतू कार्यालयात होत नव्हती.

अशा अनेक तक्रारीमूळे ही बाब शिवसेना शिंदे गटाच्या निदर्शनास येताच बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुका प्रमुख बांबू म्हाप, शिवसेना नेते सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कचेरीवर धडक दिली. अप्पर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांची भेट घेऊन सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक सेतू केंद्रामध्ये फ्लेक्स बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी व जनजागृती करण्यात यावी अशी सूचना करण्यात आल्या. या संदर्भात आपण तात्काळ कार्यवाहीचे आदेश देवू तसेच ज्या ज्या सूचना केल्या आहेत, त्यावर लेखी आदेश संबंधीतांना देवू असे अप्पर जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष आबा घोसाळे, विभाग प्रमुख शंकर झोरे, उपविभाग प्रमुख बाबा हळदणकर, उप तालुका प्रमुख राजू साळवी, विभाग. प्रमुख स्वप्निलं ऊर्फ तारक मयेकर, उपविभाग प्रमुख भिकाजी गावडे, मि रजोळे विभाग संघटक मजगांव सरपंच फैयाज मुकादम, पांवस विभाग प्रमुख विजय चव्हाण, गोळप विभाग प्रमुख नंदा मुरकर, विशेष कार्यकारी अधिकारी सिध्देश शिवलकर, माजी सरपंच जितेंद्र शिरसेकर, विभाग प्रमुख प्रवीण पवार, विभाग प्रमुख प्रविण पांचाळ, निवेंडी सरपंच सौ. रवीना कदम, खरवते संजय सकपाळ, दांडेआडम सरपंच कैलास तांबे, चांदेराई सरपंच योगेश दळी, जांभरुण सरपंच गौतम सावंत, गणपतीपुळे सरपंच सौ. कल्पना पक्ये, पिरंदवणे सरपंच श्रीकांत मांडवकर, ओरी सरपंच स्वाती देसाई, केळये सरपंच सौ सौरभी पवार, हरचेरी सरपंच दत्ताराम येरीम, प्रितम उर्फ मुन्ना घोसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular