31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeChiplunचिपळुणातील मुख्य रस्त्याचे होणार रुंदीकरण

चिपळुणातील मुख्य रस्त्याचे होणार रुंदीकरण

चिंचनाका ते पॉवरहाउस दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे १५ मीटर रुंदीकरण केले जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसह वाहनचालकांना सतावत असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील बहादूरशेखनाका ते नगरपालिका, तसेच चिंचनाका ते पॉवरहाउस दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे १५ मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर केला आहे. यामध्ये शिवनदीवरील २ पूल व मध्यवर्ती बसस्थानक ते खंड कोलेखाजनकडे जाणाऱ्या नवीन रस्त्यासह पुलाचाही समावेश केला आहे. अरूंद रस्ते व सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांचे किमान १५ मीटर रुंदीकरण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. परिणामी, वाढती रहदारी व सततच्या वाहतूक कोंडीमुळे हा प्रश्न जटील बनला असून, त्याविषयी सातत्याने ओरड होत आहे.

याविषयी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी लक्ष घातले असून, शहरातील बहादूरशेखनाका ते नगरपालिका, तसेच चिंचनाका ते पॉवरहाउस दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे १५ मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. प्रत्यक्षात १० मीटर रस्ता वाहतुकीसाठी राहणार असून, उर्वरित जागेत फूटपाथ, गटार व पाईपलाईनसाठी राखीव जागा राहणार आहे. त्याशिवाय रस्त्याच्या मधोमध दुभाजकची व्यवस्था केली जाणार आहे.

शिवनदीवरील पूलही नव्याने उभारणार – विशेष म्हणजे या दोन महत्त्वाच्या रस्त्याबरोबरच मध्यवर्ती बसस्थानक ते खंड कोलेखाजनकडे जाणाऱ्या नियोजित रस्त्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. या रस्त्यात शिवनदीवर पूल उभारावा लागणार असल्याने त्याचेही नियोजन केले आहे याशिवाय खेडेकर क्रीडा संकुलानजीकचा १९९६ मध्ये उभारलेला शिवनदी पूल अरूंद असल्याने तोही रुंदीकरणात नव्याने उभारला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular