27.6 C
Ratnagiri
Friday, February 27, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeKhedखेड नजीक वाहनांचा भीषण अपघात, १ जागीच गतप्राण

खेड नजीक वाहनांचा भीषण अपघात, १ जागीच गतप्राण

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास खेड येथे मुंबईकडे जात असताना कारला भीषण अपघात झाला.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास खेड येथे मुंबईकडे जात असताना कारला भीषण अपघात झाला. यामध्ये कारचालक किशोर अनंत चव्हाण वय ४८, रा. धामापूर संगमेश्वर यांचा मृत्यू ओढवला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

महामार्ग पोलीस केंद्र असलेल्या कशेडी हद्दीमध्ये महामार्ग क्रमांक ६६ वर खेड तालुक्यात खवटी रेल्वे पुलाजवळ आज पहाटे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर इथून मुंबई जाणाऱ्या कारला क्रमांक MH.04.BN.4193 अपघात झाला. कार वरील ताबा सुटल्याने  ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर गाडी क्रमांक MH.08.AP.6996 ला मागून धडकली. यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघातामध्ये कार चालक किशोर वसंत चव्हाण वय ४८ वर्षे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.

कुमारी सनम संदीप चव्हाण वय १२ वर्षे डोक्याला गंभीर दुखापत, हर्षदा किशोर चव्हाण वय ४० वर्षे डोक्याला गंभीर दुखापत, संतोष आबाजी चव्हाण वय ५५ वर्ष, डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत,  कुमारी रितिका केशव चव्हाण वय१६ वर्षे, डोक्याला गंभीर दुखापत, कुमार सार्थक किशोर चव्हाण वय १४ वर्षे, उजव्या हाताला किरकोळ दुखापत, स्मिता संतोष चव्हाण वय ५० वर्षे डोक्याला किरकोळ मुकामार, स्नेहा सुरज कर्वे वय २८ वर्षे डोक्याला किरकोळ दुखापत  हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरू आहेत. अपघातामधील वाहने बाजूला केली आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular