27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraअज्ञातवासात असलेले किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून जनतेसमोर

अज्ञातवासात असलेले किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून जनतेसमोर

महाविकास आघाडी सरकारचे एक एक घोटाळे टप्प्याटप्याने बाहेर काढतच राहणार, असे त्यांनी म्हटले आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून अज्ञातवासात असलेले किरीट सोमय्या आज व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. ट्विटरवर व्हिडिओ जारी करत आपल्या विरोधात कितीही आरोप केले तरी आपण दबून जाणार नाही. आणि महाविकास आघाडी सरकारचे एक एक घोटाळे टप्प्याटप्याने बाहेर काढतच राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीबाबत उच्च न्यायालयात सर्व माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, आपण सध्या कुठे आहोत याबाबत माहिती त्यांनी गुप्त ठेवली आहे.

व्हिडिओमध्ये सोमय्या म्हणाले, काँग्रेसनेच आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा आम्ही भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत यास विरोध केला होता. तेव्हाच भाजपने आयएनएस  विक्रांतसाठी निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा स्वर्गीय गोपीनाथत मुंडेदेखील आमच्यासोबत होते. त्यानंतर भाजपने निधी गोळा करण्यास सुरुवात केली. आम्ही केवळ ११ हजारांचा निधी जमा केला. मात्र, यावरून संजय राऊत वाट्टेल ते आरोप करत आहेत.

त्यांनी ५६ कोटींचा आकडा कुठून आणला, हे फक्त तेच सांगू शकतात, याबाबत अद्यापही त्यांनी काहीच माहिती दिलेली नाही. त्यांच्या आरोपानंतरच माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे त्यांचे छडयंत्र आहे. पण यामुळे मी घाबरून जाऊन मी महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणे थांबवणार नाही आहे. आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या निधीबाबत आम्ही उच्च न्यायालयाला आवश्यक ती सर्व माहिती देऊ, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट सांगितले आहे.

मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular