एलआयसीने दामदुप्पट परतावा देणारी नवी योजना अंमलात आणली आहे, अशी बतावणी करत खातेधारकांकडून लाखो रुपये उकळून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवत खातेधारकांना गंडा घातल्याचा प्रकार गेले काही दिवस चर्चेत असून यामध्ये एका एजंटसह लांजातील एका व्यावसायिकाचा हात असल्याचे बोलले जाते. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर खातेधारकांनी आता धावाधाव सुरू केली असून रितसर तक्रार मात्र अजूनपर्यंत दाखल झालेली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.
मार्केटमध्ये रोज नवनवीन कंपन्या येत असतात. गुंतवणुकीतून जास्तीतजास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेक बोगस कंपन्यांकडून अनेकांची फसवणूक झाल्याचे उघडकीला आले आहे. गेले दोन ते तीन वर्षापूर्वी फॉरेन करन्सीमध्ये शेअर मार्केटचे मोठे फॅड आले होते. गव्र्व्हमेंट अधिकाऱ्यांसह अनेक उद्योजक, बिल्डर आदींनी त्यामध्ये पैसा गुंतवला. प्रत्येकजण आपापली टीम वाढवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामध्ये एका एजंटचा पुढाकार फार मोठा होता.
दामदुप्पट पैसे मिळतील – वादग्रस्त असलेला हा एजंट आपल्या जुन्या खातेधारक्राकडे गेला. त्या खातेधारकाचा विश्वांस संपादन करून त्याने एलआयसीच्या नवी योजना आली असल्याचा दावा करत त्याबाबत माहिती दिली. प्रत्यक्षात ती योजनाच अंमलात आली नव्हती असे आता चर्चीले जात आहे. या योजनेतून दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष तो आपल्या खातेधारकांना देत होता.
लाखो रूपये घेतले – खातेंधारकाकडे आलेला एजंट हा विश्वासातील होता. मांत्र त्याचे कारनामे त्या खातेधारकाला माहित नव्हते. त्यामुळे एलआयसीमध्ये गुंतवलेले पैसे जाणार कोठे? असा समज खातेधारकाचा झाला आणि खातेधारकाने जमा केलेली आयुष्यभराची पुंजी त्या एजंटच्या हाती दिली अशी चर्चा आता सुरु आहे.
वेळोवेळी भूलथापा – पैसे गुंतवल्यानंतर खातेधारकाने त्याच्या पावत्यांची मागणी त्या एजंटकडे केली. मात्र म ाझ्यावर विश्वास नाही का? आजपर्यंत तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसी मीच भरत आलोय, माझ्यावर विश्वास ठेवा अशा भूलथापा तो वादग्रस्त एजंट खातेधारकांना देत होता अशीही चर्चा सुरु आहे.
३ वर्षे उलटली – एलआयसीच्या नावाखाली पैसे घेऊन ३ वर्षे उलटली तरी दरवर्षी मिळणारा दामुदुप्पट परतावा खातेधारकाला मिळाला नाही. त्यामुळे खातेधारकाने त्या एजंटकडे त्याची विचारणा केली. एजंटने कंपनी एकत्रित मोठ्या रक्कमेच परतावा देणार आहे, आता घाई करू नका असे वेळोवेळी सांगून वेळ मारून नेली असेही चर्चीले जाते.
लांजातील जोडीदार – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारी मोठी टोळी रत्नागिरीत सक्रीय झाली होती. त्यामध्ये त्या एजंटचा एक जोडीदार होता. लांजातील जोडीदार हा व्यावसायिक असल्याने या दोघांनी मिळून आपापल्या ओळखीतील लोकांकडून लाखो रुपये उकळले असे चर्चीले जात आहे.
झटपट श्रीमंत व्हायचे स्वप्न – भारतीय शेअर मार्केट असेल अथवा परकीय शेअर मार्केट. त्यामध्ये इन्ट्रा डे नावाची एक कन्स्पेट आहे. सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर गुंतवणूक सुरू होते. शेअर बाजार तेजीत आहे, ज्या कंपनीमध्ये शेअर गुंतवले त्या कंपनीच्या शेअरची अपडेट मोबाईल स्क्रीनवर दिसत असते. दुपारी ३ वाजण्याच्या आत इन्ट्रा डे सेल किंवा बाय हे करायचे असते आणि त्यातच श्रीमंत होण्याचे स्वप्न बघून लोकांकडून जमवलेले लाखो रूपये त्यांनी शेअर मार्केटमध्ये घालवले.
नॉट रिचेबल झाले – आता आपले काही खरे नाही. लोकांना पैसे द्यायचे कसे? जो तो एकमेकांकडे बोट दाखवू लागला. काहींनी तर पैसे देण्याची हमी देत तसे चेक खातेधारकांना दिले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यातच फुटकी कवडी नसल्याने हे चेक वटणार तरी कसे? असा प्रश्न खातेधारकांसमोर उभा राहिला आहे.
काही लाखांच्या घरात आकडा – दामदुप्पट पैसे देणारी स्कीम सांगून लोकांकडून लाखो रूपये या जोडगोळीने उकळले. काही ठिकाणी एलआयसीचे नाव वापरले. एजंट असलेला व्यक्तीच स्कीम सांगतो असा समज आहे. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. मात्र आता साऱ्यांचीच फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा आकडा हा काही लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
कायदेशीर प्रक्रिया होणार – या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी काहीं खातेदार आता धडपड करीत आहेत. मात्र भलताच पोहोचलेला तो एजंट रात्रीच्या वेळेस काहींना कॉल करून तुमचे पैसे मिळतील असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहे. काहींना तर भेटायला येण्याचे मेसेज देखील त्याने केल्याचे चर्चीले जाते.
एलआयसी ऑफिसमध्ये तक्रार करणार – काही खातेधारकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एलआयसीच्या नावाखाली आमची फसवूणक झाली आहे. लाखो रूपये आमच्याकडून एलआयसी पॉलिसीसाठी एजंटने घेतले. त्याच्या ना कोणत्या पावत्या दिल्या, ना कोणता मोबदला अद्याप आम्हाला मिळाला. लवकरच एलआयसी ऑफिसमध्ये त्याबाबतची रितसर तक्रार करणार असल्याचे काही खातेधारकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.