28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriअनैसर्गिकरित्या शरीर कमवणे आरोग्यासाठी भविष्यात घातक ठरू शकते

अनैसर्गिकरित्या शरीर कमवणे आरोग्यासाठी भविष्यात घातक ठरू शकते

म्हणून मी महाराष्ट्र असोसिएशनला विनंत करतो की त्यांनी नैसर्गिकरित्या शरीर कमावण्याबाबत स्पर्धकांचे प्रबोधन करून महाराष्ट्रात नवा पायंडा पाडवा.

स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उदय सामंत यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

नाम. उदय सामंत पुढे म्हणाले कि, बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील स्पर्धकांनी नैसर्गिकरित्या व्यायामाच्या जोरावर आपले शरीर कमावणे ही काळाची गरज आहे. अनैसर्गिकरित्या शरीर कमवण्याचे दुष्परिणाम कालांतराने भोगावे लागतात. माझ्या समोर अशी अनेक उदाहरण आहेत. एका मित्राने इंजेक्शन घेऊन कमावण्यात आलेल्या बॉडीवर आता परिणाम दिसू लागले आहे. त्याच्या दोन्ही दंडामध्ये गाठी झाल्या आहेत.

बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील स्पर्धकांनी योग्य खुराक आणि व्यायामाच्या जोरावर नैसर्गिक शरीर कमवावे. स्टेरॉईड सारखे इंजेक्शन घेऊन अनैसर्गिकरित्या शरीर कमवणे आरोग्यासाठी भविष्यात घातक ठरू शकते. असोसिएशननसे नैसर्गिकरित्या शरीर कमावण्याबाबत स्पर्धकांचे प्रबोधन करून महाराष्ट्रापुढे नवा पायंडा पाडावा, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

म्हणून मी महाराष्ट्र असोसिएशनला विनंत करतो की त्यांनी नैसर्गिकरित्या शरीर कमावण्याबाबत स्पर्धकांचे प्रबोधन करून महाराष्ट्रात नवा पायंडा पाडवा. राज्यातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात आपण देशपातळीवरील स्पर्धा भरवता येईल का, यावर विचार करू. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सौ. साठे यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रशांत पवार, नियोजन समिती अध्यक्ष आनंद तापेकर, राजेश शेळके, जमीर खलफे, प्रणिल पाटील यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन पत्रकार जान्हवी पाटील तर आभारप्रदर्शन मुश्ताक खान यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular