28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeRatnagiriनिरूळ ग्रामपंचायत सरपंच निवडणूक बिनविरोध, मागील कामाची पोचपावती

निरूळ ग्रामपंचायत सरपंच निवडणूक बिनविरोध, मागील कामाची पोचपावती

गावामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असताना देखील भाजपच्या काही लोकांना समाविष्ट करून निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी पूर्वी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्याच व्यक्तीला बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मात्र रत्नागिरी तालुक्यातील निरूळ ग्रामपंचायतीने निवडणुकीला फाटा देत उमेदवारांची निवड करून निवडणूक बिनविरोध केली. थेट सरपंचपदी दुसऱ्यांदा श्रेयशी प्रमोद बने यांची निवड झाली आहे.

२०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन पक्ष मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय करण्यात आला. गावामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे अंतर्गत मतभेदाला चालना मिळू नये यासाठी बिनविरोधचा पर्याय गावासमोर ठेवण्यात आला. सरपंचपद महिला राखीव असल्याने थेट सरपंच निवडणुकीत श्रेयशी बने यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.

सौ. बने यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर व त्यांनी पाच वर्षांमध्ये सर्व वाडीतील ग्रामपंचायत सदस्य व मतदार यांना चांगल्या तऱ्हेने प्राधान्य देऊन कामे केल्यामुळे पुन्हा एकदा सरपंचपदी विराजमान करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्यांदा थेट सरपंच निवडणुकीत सौ. बने यांना निवडण्यात आले. गावामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असताना देखील भाजपच्या काही लोकांना समाविष्ट करून निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून गावांमध्ये विकासकामे करण्यात आली. २०२२ च्या निवडणुकीमध्ये पुन्हा सरपंचपद राखीव झाल्यामुळे गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर व कोरोना काळात केलेले विशेष कौतुकास्पद काम यामुळे शिवसेनेमध्ये दोन गट पडूनही यावेळी निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रतिष्ठित व्यक्तींच्या निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे ठाकरे गट शिंदे गट व भाजप यांनी एकत्रित येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

RELATED ARTICLES

Most Popular