28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriव्यापाऱ्यांचा पुलावरून पाण्यात उड्या घेऊन जलसमाधीचा इशारा

व्यापाऱ्यांचा पुलावरून पाण्यात उड्या घेऊन जलसमाधीचा इशारा

या पुलावरील वाहतूक बंद असल्याने गेल्या दोन वर्षापासून शहरातील व्यापार ठप्प आहे. अनेकांवर कर्जबाजारीची वेळ आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाचे काम सुरु बंद पुन्हा सुरु स्थितीत आहे. त्यामुळे या बांधकामाच्या कामामुळे अनेक व्यापार्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि काम पूर्णत्वास जाण्याचे काहीच चिन्ह दिसत नसल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.

म्हाप्रळ-आंबेत नादुस्त पुलाच्या पिलरच्या कामाला सुरुवात झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहर व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व व्यापारी सदस्यांनी म्हाप्रळ-आंबेत पुलास भेट देत जागेवर प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतला. पुलाच्या पाहणीसाठी व्यापाऱ्यांनी केलेल्या दौऱ्यात शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, सचिव कौस्तुभ जोशी, दीपक घोसाळकर, राजेश पारेख, श्रीपाद कोकाटे, नीलेश गोवळे, प्रवीण जाधव, आनंद नारकर, यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, या वेळी वरिष्ठ शाखा अभियंता उलागडे यांच्याकडे दूरध्वनीवरून संपर्क साधून कामाची सद्यःस्थिती जाणून घेत संथ गतीने सुरू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत कामाची वर्कऑर्डर तातडीने व्हावी, अशी मागणी केली.

या पुलावरील वाहतूक बंद असल्याने गेल्या दोन वर्षापासून शहरातील व्यापार ठप्प आहे. अनेकांवर कर्जबाजारीची वेळ आली आहे. शहरातील पन्नास टक्यांहून अधिक व्यापार रहदारीअभावी ठप्प झाल्याने शहर व्यापारी संघटनेच्यावतीने पुलाच्या कामासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनास वेळोवेळी लेखी सूचना देण्यात आल्या व आंदोलनाची भूमिका घेण्यात आली;  मात्र प्रशासनाची गाडी चर्चेच्या पलीकडे जात नसल्याने ११ डिसेंबरला या पुलावरून जलसमाधी घेण्याचा इशारा शहर व्यापारी संघटनेच्यावतीने प्रशासकीय यंत्रणाना देण्यात आला आहे.

प्रशासनाकडून त्वरित काम मार्गी लावण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यातच गेल्या आठवड्यात पिलरचे पाण्याखालील कामासाठी टेस्टिंग सुरू झाल्याने सार्वजनिक बांधकामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कामाची वर्कऑर्डर झाली आहे का? ठेकेदार कोण? कामाची गती काय आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी शहर व्यापारी संघटनेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. याचबरोबर १० डिसेंबर अखेर कामाची वर्कऑर्डर न झाल्यास पुलावरून पाण्यात उड्या टाकून जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाच्या भूमिकेचा पुनरोच्चार या दौऱ्यात करण्यात आल्याने प्रशासन यावर कोणत्या उपाययोजना करणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular