30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRatnagiriएसीबी'कडून माझ्या निष्ठेचे मोल हे दुर्दैवी - राजन साळवी

एसीबी’कडून माझ्या निष्ठेचे मोल हे दुर्दैवी – राजन साळवी

माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो.

काही दिवसांपूर्वी घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्यांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन, दादर येथे शिवसेना चालवली, वाढवली, आज राज्यकर्ते झालेल्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने घरातील आसनांची किंमत ठरवावी, हे दुर्दैवीच, अशी हताश प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत रूजवली.

ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या परवानगीने माझ्या निवासस्थानी आणले असून, मी त्याची नित्यपूजा करतो. माझा चिरंजीव अथर्व याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेने त्यांचे एक सुंदर चित्र रेखाटले. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो; माझ्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्या आसनाला व फोटोला मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो. त्याची किंमत ठरवली, हे खूप दुर्दैवी आणि क्लेशजनक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

RELATED ARTICLES

Most Popular