27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunचिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा

चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा

एका अॅपद्वारे सांगली येथील ट्रेडर्सकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली.

हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली येथील एका व्यावसायिकाविरूद्ध येथील पोलीस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक़ माहितीनुसार, येथील हॉटेल व्यावसायिक सुनिल जनार्दन बक्षी (वय ६७, रा. तुलसी अपार्टमेट, प्रभातरोड मार्कडी चिपळूण) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. बक्षी यांनी २ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हॉटेलसाठी लागणारे विविध प्रकारच्या साहित्याची मागणी केली होती.

त्यासाठी त्यांनी एका अॅपद्वारे सांगली येथील ट्रेडर्सकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली. त्यासाठी टप्या-टप्प्याने २ लाख ७० हजार ७३ रूपये त्यांच्या खात्यात जमा केले. परंतू अनेक दिवस उलटूनही संबंधित ट्रेडर्सकडून कोणत्याही प्रकारचा माल किंवा रक्कम परत केलेली नाही. याबाबत तक्रारदार बक्षी यांनी सांगितले की, संबंधीत ट्रेडर्स सांगली येथील असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात जागेवर त्यांचे काही स्तीत्व नाही, तसेच त्यांचा जीएसटी क्रमांकदेखील बनावट असल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular