22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपर्यटकांचाही झाला हिरमोड जलक्रीडा बंदमुळे उलाढाल ठप्प - व्यावसायिक नाराज

पर्यटकांचाही झाला हिरमोड जलक्रीडा बंदमुळे उलाढाल ठप्प – व्यावसायिक नाराज

जल व साहसी क्रीडा पर्यटन काल पासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन विभागाकडून प्राप्त झाल्यावर जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवरील सुमारे १० लाखांची उलाढाल थांबली आहे. पर्यटन हंगाम संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात हे आदेश प्राप्त झाल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, पर्यटकांचाही हिरमोड झाला आहे. मागील काही वर्षात दापोली तालुक्यातील हर्णे, कदें, गुहागर आणि पालशेत तर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे – काजीरभाटी, आरे-वारे या ठिकाणी किनारी भागात साहसी क्रीडाप्रकारांसह नौकानयन सुरू करण्यात आले आहे. यामुळे किनाऱ्यावरील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. यावर्षी उशिराने सुरू झालेल्या पर्यटन हंगामात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली होती. विशेषत: जलपर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. एकट्या गणपतीपुळे किनारी १७ नौका आणि १२ जेट स्की आहेत. अन्य किनाऱ्यांवरही या प्रमाणात व्यावसाय करणारे आहेत.

पर्यटन हंगामात जिल्ह्यातून सुमारे दररोज २० लाखांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. वॉटरस्पोर्टस् चालविणाऱ्या संस्थांना ३१ मेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मान्सून जूनमध्ये सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. गेले दोन दिवस किनारी भागात वारे वाहू लागले आहेत. हवामानातील या बदलांमुळे पावसाची शक्यता आहे. उत्साही पर्यटकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी पर्यटन संचालनालयाचे सहायक संचालक रवींद्र पवार यांनी सर्व वॉटरस्पोर्टस् संस्थाचालकांना कालपासून ३१ ऑगस्टपर्यंत जलपर्यटन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मिळाल्यावर आज जलपर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. चौथा शनिवार व रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

शेवटच्या टप्प्यात गणपतीपुळेमध्ये दिवसाला दहा ते बारा हजार पर्यटक येऊन जात आहेत. उन्हाचा कडाका असला तरीही पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. ऐन हंगामात जलक्रीडा बंद ठेवण्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर फक्त फिरण्यापेक्षा नौकानयन, जेटस्कीमधून समुद्रात सैर करण्याचा आनंद वेगळाच असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी पर्यटक एक दिवस मुक्काम करतात. जलक्रीडा बंद झाल्यामुळे पर्यटक थांबणे शक्य नाही. त्याचा परिणाम निवासाच्या आरक्षणार होऊ शकतो, असे जलक्रीडा आयोजकांकडून सांगितले जात आहे. ता. १ जूनपासून मच्छीमारी बंदी कालावधी सुरू होतो. ते खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात; मात्र किनारयावर विशिष्ट अंतरापर्यंत जेटस्की, नौकानयन करणाऱ्यांना बंदी घालणे किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular