24 C
Ratnagiri
Wednesday, March 26, 2025

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

‘ते’ कंत्राटी शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना...

मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे ? सिव्हिल-वैद्यकीय महाविद्यालयात समन्वयाचा अभाव

जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन...
HomeChiplunलोटे परिसरातील 'त्या' कंपनीचा शोध सुरूच

लोटे परिसरातील ‘त्या’ कंपनीचा शोध सुरूच

नाला पुढे खाडीत जाऊन मिळत असल्याने मासेमारीवर परिणाम होणार आहे.

लोटे परिसरातील घाणेखुंट कोतवली नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी राजरोस सोडल्याने मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीचा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांना कंपनीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सांडपाणी सोडण्याचे कृत्य करण्याची “योजना” कोणाची आहे, याची चर्चा रंगू लागली. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्या पावसाळ्यात आपले रासायनिक सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रकल्प केंद्रात न सोडता थेट पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या नाल्याला सोडतात.

दुर्दैवाने हा नालाही या सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाशेजारीच असल्याने अनेकांचे फावते. काही दिवसांपूर्वी घाणेखुंट कोतवली गावातील नाल्यात असेच रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या नाल्याचे पाणी लाले लाल झाले होते. हाच नाला पुढे खाडीत जाऊन मिळत असल्याने मासेमारीवर परिणाम होणार आहे. तसेच घाणेखुंट, सोनगाव, कोतवली व पुढे खाडी किनाऱ्याजवळच्या शेतीवर परिणाम होतो. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत या क्षेत्रीय अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने उपप्रादेशिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

RELATED ARTICLES

Most Popular