29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedकातभट्टीवर तत्काळ कारवाई करा - नीलेश राणे

कातभट्टीवर तत्काळ कारवाई करा – नीलेश राणे

नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.

कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केलीत असा सवाल भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे ‘यांनी अधिकाऱ्यांना केला. येथील ग्रामस्थ दडपणाखाली असल्याचे जाणवत असून १२ वर्षे पाणी प्यावं लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही ग्रामस्थ व पत्रकारांशी बोलताना राणे यांनी दिली. सावर्डे येथील कातभट्टीचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना होत आहे.

गेले काही दिवस कातभट्टीचे पाणी थेट येथील नदीत जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. येथील विहिरी व बोरवेलला लालभडक प्रदूषित पाणी येत असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. गेले कित्येक वर्षे हा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार ग्रामस्थांनी केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

माजी खासदार नीलेश राणे यांनी याची दखल घेत शुक्रवारी सावर्डे भुवडवाडी येथील पऱ्यातून वाहत असलेल्या कातभट्टीतील प्रदूषित सांडपाण्याची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तुम्ही संबंधितांवर कारवाई कधी करणार? असा सवाल विचारला. आता आपण स्वतः पाण्याचे नमुने घेऊन जाणार असल्याचे सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे, हा विषय तिथंपर्यंत पोहोचवणार असल्याचे अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.

सावर्डे-भुवडवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिरात बैठक झाली. या वेळी ग्रामस्थांनी नीलेश राणे यांना निवेदन दिले. या वेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विष्णू सकपाळ, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, माऊली चव्हाण, राजा यादव, ग्रामस्थ सलीम चिकटे, सुरेश भुवड, प्रवीण भुवड, विजय झोरे, अनिल भुवड, अनंत भुवड, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सावर्डेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular