27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunखंडणीच्या कॉलला बळी पडू नका, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने

खंडणीच्या कॉलला बळी पडू नका, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने

सोशल मीडियाचा गैरवापर वाढला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी तरुणींकडून तरुणांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याची सेक्स्टॉर्शनचा नवीन फंडा रूजू लागला आहे. सेक्स्टॉर्शनच्या विळख्यात तरुणाई सापडत आहे. सोशल मीडियाचा गैरवापर वाढला आहे. राजस्थानसह युपी, बिहार, दिल्लीमध्ये अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या टोळ्या आहेत. असे कॉल आले तर प्रथम पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी केले. राजमाने म्हणाले, आता स्मार्ट फोन नवीन राहिलेला नाही. मनोरंजन, कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर वाढला आहे.

अशा ऑनलाईन तरुणांना हेरून सायबर गुन्हेगार पाळत ठेवतात. ऑनलाईन मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. यातून अनेकजण अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. सेक्स्टॉर्शनचे बळी होण्यापासून सावध राहणे आताच्या काळात गरजेचे आहे. आता सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार सेक्स्टॉर्शनकडे वळले आहेत. पुरावा उघड करण्याची धमकी देऊन, एखाद्याकडून पैसे उकळण्याची किंवा लैंगिक इच्छेची मागणी यात केली जाते. सायबर क्रिमिनल्स आता केवळ पुरुषच आहेत, असे नाही तर अनेकवेळा काही महिलाही याचा गैरफायदा घेत आहेत.

हा एक ब्लॅकमेलचाच प्रकार आहे. गुन्हेगारांकडून या माध्यमातून लैंगिक अनुकूलता पैसे किंवा इतर स्वरूपाची मागणी केली जाते. यासाठी वेठीस धरले जाते. यात गुन्हेगारांकडे समोरच्याशी काही तडजोड करण्यास भाग पाडू शकतील, अशा आक्षेपार्ह छायाचित्रांचा संच, व्हिडिओ असतात. समोरच्याने जर अपेक्षित प्रतिसाद दिला नाही तर मटेरियल ऑनलाईन प्रकाशित करण्याची किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत शेअर करण्याची धमकी दिली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular