26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या मिरकरवाड्यात जोरदार राडा…

रत्नागिरीच्या मिरकरवाड्यात जोरदार राडा…

अवघ्या ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून सुरू झालेल्या वाद.

रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटी परिसरात मंगळवारी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमली, तर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवावा लागला, दरम्यान आता पूर्णता शांतता असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीसांनी केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आणि पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, मिरकरवाडा जेटीवर एका ग्राहकाने पिशवी विक्रेत्याकडून ३ रुपयांची पिशवी खरेदी केली. मात्र ग्राहकाकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने गुगल पे द्वारे पैसे देण्याची तयारी दर्शवली आणि विक्रेत्याकडे क्यूआर कोड मागितला. मात्र, विक्रेत्याने याला उद्धटपणे उत्तर दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद काही क्षणांतच वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

मोठी गर्दी – वाद वाढल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे ३० ते ४० जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. दुसरीकडे, पिशवी विक्रेत्यानेही आपल्याला ग्राहक आणि त्याच्या साथीदारांकडून मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील काही जणांना दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वेगळे वळण देण्याचा प्रयत्न – घटनेनंतर ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी थेट जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तर पिशवी विक्रेत्याने हुशारी दाखवत आधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि नंतर रुग्णालयात दाखल झाला. दरम्यान या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. मात्र तो असफल ठरला.

समर्थकांची मोठी गर्दी – हाणामारीनंतर दोन्ही गट जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, जिथे त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली. यामुळे रुग्णालय परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. शहर पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, तुमची काही तक्रार असेल तर आधी पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार दाखल करा, असा सल्ला दिला. यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली.

परस्परविरोधी तक्रारी – या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्राहक आणि त्याच्या साथीदारांचा दावा आहे की, त्यांना जम ावाने बेदम मारहाण केली, तर पिशवी विक्रेत्याने ग्राहक गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारी नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नागरिकांना संयम राखण्याचे साणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शहर पोलिस निरिक्षक शिवरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular