27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeChiplunलोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी - भाजपची भूमिका

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजपला मित्रपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या ‘उमेदवारांना विद्यमान आमदारांनी तसेच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात लीड दिले, तरच त्यांना विधानसभेचे तिकीट मिळेल, अशी “अट भाजपने आपल्या पक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या आमदारांना घातली आहे. भाजपचा हा नियम रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या “मित्रपक्षातील आमदारांनाही लागू होतो. त्यामुळे येथील भाजपच्या मित्रपक्षातील आमदारांची खरी कसोटी असणार आहे. राज्यात भाजपची ताकद जास्त आहे.

अनेक ठिकाणी जागा शिवसेनेची, खासदार शिवसेनेचा तरीही उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून वाकडी वाट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलेल्या खासदारांचे भाजपने मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकून उमेदवार बदलले तर काही जागांवर शिवसेनेऐवजी भाजपचे उमेदवार उभे केले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे. येथील विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपचे नीतेश राणे केवळ एकमेव आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजपला मित्रपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भाजपची या मतदारसंघातील मदार शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर आणि शेखर निकम यांच्यावर आहे. नारायण राणे यांच्या विजयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपला काहीही करून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. यामुळे सगळे रूसवेफुगवे विसरून आमदारांनी कामाला लागावे यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात लीड द्यावे; अन्यथा तिकीट नाही, अशी तंबीच सर्वांना दिली आहे.

मग आमदारांचे का नाही ? – आमदारांची कामगिरी चांगली नाही, त्यांचे तिकीट भाजपने कापले आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेचाही समावेश आहे. जर भाजप शिंदेंना त्यांची साथ देणाऱ्या खासदारांचे तिकीट कापण्यास भाग पाडू शकतो, तर मग आमदारांचे का नाही? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular