32.4 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeEntertainmentधनश्रीने सोशल मीडिया हँडलवरून चहलचे नाव हटवल्याने चर्चा

धनश्रीने सोशल मीडिया हँडलवरून चहलचे नाव हटवल्याने चर्चा

नक्की दोघांमध्ये काय बिनसलं आहे कि काय झाले आहे हे कळण्यास मार्ग नसल्याने चाहते देखील त्या दोघांच्या इतर कृतींवर लक्ष ठेवून आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर पत्नी धनश्री सध्या चर्चेत आहेत. वास्तविक धनश्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहलचे नाव हटवले आहे. हे पाहून या जोडप्यामध्ये काही बिनसले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लग्नानंतर धनश्री वर्माने आपल्या नावाला युजवेंद्र हे आडनाव जोडले होते. मात्र, धनश्रीने अद्याप युझवेंद्रसोबत शेअर केलेले फोटो आपल्या अकाऊंटवरून हटवलेले नाहीत.

धनश्रीचे नाव काढताच युझवेंद्रने एक नोटही शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे – न्यू लाईफ लोडिंग. सोशल मीडियावर नेहमीच प्रेमळ क्षण शेअर करणाऱ्या या जोडप्याची अशी प्रतिक्रिया पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. नक्की दोघांमध्ये काय बिनसलं आहे कि काय झाले आहे हे कळण्यास मार्ग नसल्याने चाहते देखील त्या दोघांच्या इतर कृतींवर लक्ष ठेवून आहेत.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पहिल्यांदाच ऑनलाइन क्लास दरम्यान एकमेकांना भेटले. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. केवळ ३ महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट २०२० रोजी, युझवेंद्रने रोकेची बातमी सांगताना त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

धनश्रीसोबतचा एक फोटो शेअर करून त्यांनी आपले नाते अधिकृत केले आहे. यानंतर २२ डिसेंबर २०२० रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर ही जोडी त्यांच्या क्यूटनेस आणि रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत राहिली. अनेकदा त्यांच्या नृत्य आविष्काराचे व्हिडियो धनश्री सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.

RELATED ARTICLES

Most Popular