27.6 C
Ratnagiri
Thursday, June 12, 2025

‘केरा केरलम’ची कोकणात होणार लागवड

वातावरणाला पूरक, अधिक उत्पन्न देणारी केरळमधील 'केरा...

राजापूर आठवडा बाजाराला लागणार शिस्त…

नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये झालेल्या...

रत्नागिरी पालिकेकडून अधिकृत होर्डिंग्जही हटवली

पावसाळ्यात वाऱ्याच्या वाढत्या वेगासोबतच वादळात होर्डिंग्ज कोसळण्याच्या...
HomeRatnagiriराजापूरच्या “त्या” वाहकावर कारवाईची मागणी

राजापूरच्या “त्या” वाहकावर कारवाईची मागणी

गेली दोन वर्षे कोरोना काळात शासनाची सर्व फि भरलेल्या माडी व्यावसायिकांनी मोठ्या अडचणीचा सामना करत हा व्यवसाय सुरु ठेवला आहे

जैतापुरचे माजी सरपंच गिरीष करगुटकर यांनी एसटी प्रशासनाकड़े पास असून देखील पार्सल नाकारल्याने, आणि राजापुर एसटी डेपो अधिकारी वर्गाचे नाव पुढे करीत महीना पास असलेले पार्सल गाडीत घेण्यास असमर्थता दर्शवल्याने, राजापुर एसटी डेपोचे वाहक श्री. नदाप यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या झालेल्या प्रकाराबाबत जैतापुरचे सरपंच गिरीष करगुटकर यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोनामध्ये आम्ही माडी व्यावसायिक महीना पास घेऊन एसटीवरुन माडी पार्सल करतो. गेली कित्येक वर्षे एसटी प्रशासन आम्हाला चांगली सेवा देत आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात शासनाची सर्व फि भरलेल्या माडी व्यावसायिकांनी मोठ्या अडचणीचा सामना करत हा व्यवसाय सुरु ठेवला आहे, यावर अनेकांचे कुटुंबाचे उदरभरण होत आहे.

अनेक वर्षे एसटीवरुन ही सेवा नियमित सुरु असताना आणि एसटीचे जिल्हाभरातील सर्व चालक/वाहक देखील या व्यवसायाला संपूर्ण सहकार्य करीत असताना मात्र, राजापुर डेपोचे वाहक श्री.नदाप हे आपणच पासधारकांवर मेहेरबानी करतो आहोत अश्या आविर्भावात वर्तणूक करत असल्याचा आरोप करगुटकर यांनी केला आहे. माडी व्यावसायिक नारायण करगुटकर हे स्वत: आपले पार्सल घेऊन जात असताना नदाप यांनी त्यांच्याशी ग़ैरवर्तवणूक करीत त्यांचे पार्सल नाकारत त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याने त्यांनी यापूर्वीच त्यांची तक्रार एसटी प्रशासनाकडे केलेली आहे.

महिनाभराचा पास असलेले करगुटकर यांचे पार्सल राजापुर डेपोचे अधिकारी श्री. मोरे यांनी आपल्याला घेऊ नये असे सांगत पार्सल घेण्याचे नाकारले असल्याची माहिती वाहक नदाप यांनी दिली आहे. यापूर्वीच आपली एक तक्रार झाली असून आपण हे पार्सल घेऊन जाणार नाही असा पवित्रा घेतला मात्र त्याचे पास आहेत,  तुम्हाला हे पार्सल घेऊन जावेच लागेल असा पवित्रा करगुटकरांसहित उपस्थितानी घेतल्यावर एसटी टपावरुन ही पार्सल सेवा स्विकारली.

अशा आडमुठ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे तर त्यात आणखीनच भर पड़त आहे. प्रवाशांना अनेक प्रकारच्या योजना जाहीर करत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. अश्यावेळी असे कर्मचारी जर प्रवाशांशी असे उन्मत वागत असतील, तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे अशी अपेक्षा सर्व थरातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular