मुंबई विमानतळावर शनिवारी, १२ नोव्हेंबर रोजी, शाहरुख खान आणि त्याच्या टीमला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याची बातमी आली. खरंतर त्याच्याकडे महागडी घड्याळे आणि लक्झरी वस्तू होत्या, ज्या तो UAE मधून आणत होता. यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला. मात्र, आता या बातमीचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. विमानतळावर शाहरुखला नाही तर त्याच्या अंगरक्षकाला थांबवण्यात आल्याची माहिती खुद्द कस्टम अधिकाऱ्यांनीच दिली होती.
माध्यमांशी संवाद साधताना कस्टम अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की शाहरुख आणि त्याच्या टीमकडून कोणताही दंड वसूल करण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून केवळ प्राथमिक औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. शाहरुख आणि त्याच्या टीमकडून आणलेल्या मालावरच उत्पादन शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. प्रसार माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.
कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, शाहरुखला नाही, तर त्याचा अंगरक्षक रवी सिंगला कस्टमचे नियम मोडल्याबद्दल विमानतळावर थांबवण्यात आले. मात्र, सीमाशुल्क भरल्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली. एसआरके आणि त्याची मॅनेजर पूजा दादलानी दोघेही विमानतळावरून आधीच निघून गेले होते. दोघांचीही चौकशी झाली नाही. अंगरक्षक रवी हे सामान घेऊन घरी येत असताना गेट क्रमांक ८ वर तपासणीसाठी थांबवण्यात आले.
तपासणी केली असता रवीकडे दोन आलिशान घड्याळे व ४ रिकाम्या घड्याळांचे बॉक्स होते. याशिवाय त्याच्या सामानात वॉच सीरीज ८ चा रिकामा बॉक्स होता. यामुळे कस्टम अधिकाऱ्यांना केवळ ड्युटी भरण्यास सांगण्यात आले. कस्टम ड्युटी भरल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. कोणाचीही चौकशी झालेली नाही.

