25.4 C
Ratnagiri
Sunday, February 22, 2026

शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण

नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी...

नको शेलू नको वांगणी’ गिरणी कामगारांना घर मुंबईतच हवे

नको शेलू नको वांगणी गिरणी कामगारांना घर...

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

अजित पवार यांना बारामतीला घेवून गेलेल्या विमानामध्ये...
HomeRatnagiriवीजग्राहकांचा ऑनलाइनकडे वाढता कल, एका महिन्यात ७१ कोटींचा ऑनलाइन भरणा

वीजग्राहकांचा ऑनलाइनकडे वाढता कल, एका महिन्यात ७१ कोटींचा ऑनलाइन भरणा

जिल्ह्यातील वीजग्राहकांचा ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे कल वाढला आहे. रांगेत उभं राहायला नको की बँक किंवा पतसंस्थेत बिल भरायची झंजट नको. थेट क्युआर कोड स्कॅन करून सोप्या पद्धतीने बिलं भरली जात आहेत. जिल्ह्यात जून महिन्यात २ लाख १० हजार ग्राहकांनी ७१ कोटी १४ लाखांची वीजबिले ऑनलाइन भरली आहेत, तर २९ कोटी रुपये ऑफलाइन भरण्यात आले आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमतून गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन व्यवहार सुरू झाले आहेत. लोकांना आता ही सुविधा अगदी सोपी आणि विनात्रास असल्याने त्याकडे वाढता कल आहे.

महावितरण कंपनीच्या वीजबिल देयकावरून ते आता अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात २ लाख ग्राहकांनी ५८ कोटी ३७ लाख वीजदेयक रक्कम ऑनलाइन भरली. मे महिन्यात २ लाख ३३ हजार ग्राहकांनी ७४ कोटी ३३ लाख वीज देयक रक्कम ऑनलाइन भरली. जून महिन्यात २ लाख १० हजार ग्राहकांनी ७१ कोटी १४ लाख वीज देयक रक्कम ऑनलाइन भरली आहे. दिवसेंदिवस वीजग्राहकांचा ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे जास्त कल वाढला आहे, तर ऑफलाइन वीजबिल भरण्याकडे कल कमी होताना दिसत आहे.

एप्रिल २०२३ या महिन्यात १ लाख ९२ हजार ग्राहकांनी १५ कोटी ६९ लाख वीजदेयक रक्कम ऑफलाइन भरली. मे महिन्यात २ लाख ४६ हजार ग्राहकांनी २६ कोटी ७३ लाख वीज देयक रक्कम ऑफलाइन भरली आहे. जून महिन्यात २ लाख २७ हजार ग्राहकांनी २९ कोटी रुपये वीज देयक रक्कम ऑफलाइन भरली आहे. यावरून ऑफलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल कमी होताना दिसत आहे.

सिंधुदुर्गात १३ कोटी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल २०२३ या महिन्यात १ लाख १६ हजार ग्राहकांनी १३ कोटी २५ लाख वीजदेयक रक्कम ऑनलाईन भरली आहे. मे महिन्यात १ लाख ३७ हजार ग्राहकांनी १९ कोटी १३ लाख रुपये वीज देयक रक्कम ऑनलाईन भरली आहे. जून महिन्यात १ लाख २५ हजार ग्राहकांनी १९ कोटी ८ लाख रुपये वीज देयक रक्कम ऑनलाईन भरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular