27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunपरशुराम घाटात विजेसह जेसीबी यंत्राची सुविधा

परशुराम घाटात विजेसह जेसीबी यंत्राची सुविधा

परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई – गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे वीज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय जेसीबी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे. महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत चारवेळा दरड कोसळली आहे. बुधवारी येथे पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्या आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्या पाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबवण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणीमार्गाने वाहतूक वळवली होती; मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे जेणेकरून रात्री-अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय दरड हटवण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून, घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular