27 C
Ratnagiri
Thursday, February 26, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeChiplunसागरी महामार्ग वैभव नष्ट करणार - शाहनवाज शाह

सागरी महामार्ग वैभव नष्ट करणार – शाहनवाज शाह

सागरी महामार्ग केला तर पुन्हा निसर्गाचे वाटोळे लागणार आहे.

सागरी महामार्गावर एवढा खर्च करण्याची गरज काय? सागरी महामार्ग कशासाठी हवा आहे? सागरी महामार्ग करून आपण आपले वैभव नष्ट करणार आहोत. यामुळे कोकणचे फार मोठे नुकसान होणार आहे व फायदा होणार आहे, तो राजकीय लोकांचा व ठेकेदारांचा, असे प्रतिपादन जलदूत आणि सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यानी केले आहे. सध्या सागरी महामार्गाबाबत चर्चा सुरू असून, त्यामध्ये वेगळे मत व्यक्त करताना शाह म्हणाले, ‘कोकणचे वैभव म्हणजे येथील निसर्गसंपत्ती मग ६० कि.मी.च्या टप्प्यात हा हायवे कशासाठी? इतर शहरे नष्ट होणार आहेत. सागरी महामार्ग केला तर पुन्हा निसर्गाचे वाटोळे लागणार आहे.

गरज आहे ती फक्त पर्यटकांना सहज सुलभरित्या समुद्रकिनारी येण्यासाठी व पर्यटकांना पाहायचे आहे ते कोकणची निसर्गसमृद्धी, समुद्रकिनारे. त्यांना हवे आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, चुलीवरचे मटण, झोपडी, पाणी, पक्षी, प्रदूषणमुक्त जागा. मग आहे हा रस्ता फक्त व्यवस्थित करणे व ते टिकवणे इतकेच काम केले तर पुरेसे आहे. हा रस्ता मोठी वाहने व ट्रेलरकरिता मोठा केला गेला तर ही सर्व निसर्गसमृद्धी नष्ट होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली अनेक वर्षे रखडले. हा महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर होणार होता; परंतु या मार्गावर वाहतूक कमी असल्याने व भविष्यात त्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही म्हणून शासनाने धोरण बदलले.

या महामार्गाचे चौपदरीकरण करताना निसर्गाचे वाटोळे लावण्यात आले. कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणारी व ऑक्सिजन देणारी, भूजलसाठा वाढवणारी, जैवविविधता जपणारी महाकाय वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. डोंगरदऱ्या फोडण्यात आल्या. अनेक गावांवर दरडी कोसळून ती नेस्तनाबूत होण्याची टांगती तलवार त्या गावांवर सदैव राहणार आहे. सागरी महामार्ग करून हेच ओढवून घ्यायचा आहे का, असा सवाल त्यानी केला.

RELATED ARTICLES

Most Popular