27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriगणेशोत्सवात प्रवाशांची लूट, ऑनलाईन बुकिंग अॅप' वर कारवाई करा

गणेशोत्सवात प्रवाशांची लूट, ऑनलाईन बुकिंग अॅप’ वर कारवाई करा

ऑनलाईन युगात ८० ते ९० टक्के वाहनांचे आरक्षण हे खासगी प्रवासी तिकीट बुकिंग ॲपद्वारे ऑनलाईन होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. याची संधी साधत खासगी प्रवासी बुकिंग ॲपद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त तथा प्रवाशांची लूटमार चालू आहे. एसटीपेक्षा दीडपट अधिक प्रवासी भाडे आकारण्याचा शासन आदेश असताना खासगी प्रवासी बसचालक प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट आणि कधी चौपट आकारणी करत आहेत. गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लूटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्यावतीने करण्यात आली आहे.

रत्नागिरी येथील महसूल विभागाच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर, शिवचरित्रकार अरविंद बारस्कर आणि हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक संजय जोशी उपस्थित होते. एकीकडे परिवहन विभागाने गणेशोत्सवात प्रवाशांची लूटमार होऊ नये म्हणून तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे; मात्र आजच्या ऑनलाईन युगात ८० ते ९० टक्के वाहनांचे आरक्षण हे खासगी प्रवासी तिकीट बुकिंग ॲपद्वारे ऑनलाईन होते. त्याकडे मात्र राज्य परिवहन विभागाचे लक्षच नाही. या विषयी परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular