24.2 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeRatnagiriप्रचाराच्या तोफा आज थंडावणार जिल्हा परिषद निवडणूक

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार जिल्हा परिषद निवडणूक

विकासाचे मुद्दे, रस्ते, पाणी आणि स्थानिक रोजगाराच्या आश्वासनांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा उद्या (ता. ५) थंडावणार आहेत. उद्या जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून, रात्री दहा वाजता प्रचार संपणार आहे. शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंधरवड्यापासून जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी सुरू असलेल्या या राजकीय रणधुमाळीचा समारोप उद्या गावोगावी निघणाऱ्या पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभा, सभा आदीने होणार आहे. जिल्ह्यातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक, अशा दोघांसाठीही प्रतिष्ठेची लढाई निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागांपासून ते किनारपट्टीपर्यंतच्या सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. विकासाचे मुद्दे, रस्ते, पाणी आणि स्थानिक रोजगाराच्या आश्वासनांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे.

महायुतीकडून मंत्री उदय सामंत, योगेश कदम यांनी दोन्ही बाजूने प्रचाराची धुरा सांभाळत रण तापवले आहे. महायुतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल सभा झाल्या; परंतु महाविकास आघाडीकडून माजी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव हे वगळता दिग्गजांच्या सभा झालेल्या नाहीत. महायुतीने मात्र महत्त्वाच्या गटांमध्ये सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. उद्या (ता. ५) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत. प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर जाऊन मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे. उद्या रात्री दहा वाजता प्रचाराची मुदत संपल्यानंतर घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे. जाहीर प्रचारावर बंदी येणार असल्याने लाऊडस्पीकरचा आवाज शांत होईल. प्रशासनाच्या वतीनेही निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, उद्याच्या शेवटच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेषतः संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि जादा कुमक पुरविण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्येही या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण उमेदवारांच्या आश्वासनांचे गणित मांडताना दिसत आहेत. रत्नागिरीत उदय सामंत यांची एकहाती सत्ता असली तरी हातखंबा आणि गोळप या दोन गटांमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. राजापूरमध्ये आमदार किरण सामंत यांनी चांगली पकड मिळविल्यामुळे तिथेही महायुतीचा प्रभाव दिसतो. चिपळूण, संगमेश्वरमध्ये आमदार शेखर निकम स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दापोली, खेडमध्ये योगेश कदम यांची सरसी दिसते.

RELATED ARTICLES

Most Popular