28.1 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraसरकारकडून लहान मुलांसाठी बाल रक्षा किट

सरकारकडून लहान मुलांसाठी बाल रक्षा किट

बाल रक्षा कीटमधील पदार्थांच्या नियमित सेवनाने मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

राज्यात कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट ऑक्टोबर दरम्यान येणार असल्याचे भाकीत केले गेले असून, लहान मुलांसाठी हि लाट धोक्याची असण्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यासाठीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने १६ वर्षां पर्यंतच्या सर्व मुलांसाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारं बाल रक्षा किट  विकसित केलं आहे.

आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाल रक्षा किटमध्ये अनु तेल, सीतोपलादी आणि च्यवनप्राश आहे. त्याशिवाय तुळस, गिलोय, दालचिनी आणि वाळलेल्या द्राक्षांपासून बनवलेलं सिरप, ज्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आहेत यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचा वापर यामध्ये केला असल्याने आरोग्य निरोगी राहण्यासाठी नक्कीच हे कीट उपयुक्त ठरेल.

बाल रक्षा कीटमधील पदार्थांच्या नियमित सेवनाने मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आयुष मंत्रालयाच्या कडक मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे किट बनवण्यात आलं आहे. हे उत्तराखंडमधील स्थित प्लांटमध्ये भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या इंडियन मेडिसीन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे तयार करण्यात आले आहे.

भारतात अद्याप मुलांसाठी कोविडची लस उपलब्ध नाही. ती सुद्धा नोव्हेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्था १० हजार किटचं मोफत वाटप करणार आहे. त्यामुळे सध्या मुलांसाठी लस उपलब्ध नसली तर, मुलांचे आरोग्य लक्षात ठेवून बाल संरक्षण किट यामध्ये नक्कीच महत्त्वाची भूमिका वठवू  शकेल.

RELATED ARTICLES

Most Popular