23 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraराज्यात सर्वत्र कार्तिकी उत्सव उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र कार्तिकी उत्सव उत्साहात साजरा

आजची कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा सोमवार १५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

विठ्ठल मंदिरात आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक दाखल झाले. यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणीमातेची पूजा करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सपत्नीक उपस्थित राहिले होते. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.

दरवर्षी एका वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान दिला जातो, या वर्षी हा वारकऱ्यांचा मान कोंडीबा देवराव टोणगे व त्यांच्या पत्नी पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे यांना मिळाला असून, हे पती-पत्नी मागील ३० वर्षापासून विठुरायाची यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या शहरी भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १५ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी निमित्त कार्तिकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने, दोन वर्षानंतर कार्तिकी महोत्सव जल्लोषात परंतु शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मध्यरात्री प्रथे परंपरेप्रमाणे, विठुरायाचा रथोत्सवही निघणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करत असून, दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होणार असल्याने, रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular