30.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

मुरुड किनारी मृत कासव ठेवले झाडाला टांगून…

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवाला मारून झाडाला...

महिलेला १० लाख रुपयांना गंडा, जादा परताव्याचे आमिष

सोशल मीडियावर वर्कफ्रॉम होमच्या नावाखाली गुंतवणुकीत जादा...

कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली, वाहतुकीला धोका

चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटेच संरक्षक...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरु असलेली निवडणुकांची रणधुमाळी आज अखेर क्षमली असेल तर, प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली आहे. शिवसेना नेते नामदार उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने वर्चस्व निर्माण केलं आहे.

निलेश राणे यांच्या पँनलचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत  दारूण पराभव झाला आहे. एकूण २१ जागांपैकी १८ जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे समर्थक निवडून आले आलेत. सहकार पॅनलचे गजानन पाटील यांनी रत्नागिरीत विजय मिळवला आहे.

१९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा बँकेसाठी  मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण ८७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला होता. या निवडणुकीत ८७.४५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागा आहेत. या २१ जागांपैकी १४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर इतर जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या ७ जागांसाठी एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विकास सेवा संस्था मतदारसंघात रत्नागिरी व गुहागर मधून सहकार पॅनेलचे गजानन पाटील, अनिल जोशी विजयी झाले. लांजात सहकार पॅनेलला धक्का बसला असून, विद्यमान संचालक आदेश आंबोळकर हे पराभूत झाले. याठिकाणी महेश खामकर हे विजयी झाले. श्री. आंबोळकर याना १६ तर श्री. खामकर याना १८ मते मिळाली.दुग्ध मतदारसंघातही सहकार पॅनेलला धक्का बसला आहे. येथे सहकार पॅनेलचे गणेश लाखण हे पराभूत होऊन, अजित यशवंतराव हे विजयी झाले. श्री. लाखण यांना १० तर श्री. यशवंतराव २५ याना मते मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular