HomeRatnagiriवाढदिवसाचा अनोखा संकल्प

वाढदिवसाचा अनोखा संकल्प

भैया सामंतांच्या वाढदिवसानिमित्त या वृध्दाला व्यवस्थित राहण्याजोगे घर बांधून देण्याचा संकल्प केला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हि सगळ्यात प्रिय आणि अविस्मरणीय गोष्ट असते. त्यामुळे सध्या स्वत:चा असो वा मित्राचा पण तो अविस्मरणीय बनवायचा. कालच रत्नागिरी मधील प्रसिद्ध उद्योजक आणि किंगमेकर, किरण सामंत यांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र आणि शुभचिंतकाना कायम लक्षात राहावा असे गिफ्ट त्यांनी द्यायचे ठरविले.

तालुक्यातील वाटद- मिरवणे येथील वरची बाचरेवाडी येथे ७४ वर्षीय कृष्णा बाचरे हे एकाकी आणि खडतर परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेली पंधरा वर्ष ते एकाकी जीवन जगत आहेत. मिळेल ते रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.

गेली १५ वर्ष एका पडक्या घरात ७४ वर्षीय आजोबांनी संसार थाटला आहे. त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्या मदतीला धावले. ते किरण उर्फ भैया सामंत यांचे दोन खंदे शिलेदार. या दोघांनी मिळून भैया सामंतांच्या वाढदिवसानिमित्त या वृध्दाला व्यवस्थित राहण्याजोगे घर बांधून देण्याचा संकल्प केला आहे. घराची अवस्था एवढी बिकट आहे की ते कधी पडेल हेही सांगता येणार नाही. घर बांधण्यासाठी लागणारे जांभे चिरे दाखल झाले असून गवंडीकाम व सुतारकाम करणार्‍यांनाही घराचे काम लवकर करण्याची विनंती केली आहे.

घराच्या फक्त दोनच भिंती उरल्या असून एका बाजूने पत्रे लावण्यात आले आहेत. वासे आणि कौले एका बाजूला पडण्याच्या स्थितीत असून त्याठिकाणी लाकडाचे टेकू देऊन उभे करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचे खंदे समर्थक अजिम चिकटे व अरूण झोरे यांनी पुढाकार घेत या वृध्दाला स्वत:चे छोटेसे घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेतला. भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त या कृष्णा बाचरे यांना घर बांधून देऊन त्यांचे उर्वरित जीवन थोडेतरी सुखकर करण्याचा प्रयत्न दोघांनी सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular